Monday, August 5, 2024

महाराष्ट्र मध्ये सोयाबीन पिकावर आळाईचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव/शेतकरी हवालधिल, कृषी खात्याने मार्गदर्शन करावे., अशी शेतकऱ्यांची मागणी

 महाराष्ट्र मध्ये जवळपास 70 ते 80 टक्के सोयाबीनची पेरणी झालेली आहे. आणि त्यामध्ये सोयाबीन वर जास्त प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव पायाला दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढलेली आहे.

 सोयाबीन पिकावरील  आळी







सोयाबीन पिकावर आळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंतेत.


न्यूजबदलता महाराष्ट्र:-

महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी खूपच जास्त पाऊस झाला आहे. आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये फारच कमी पाऊस अजून सुद्धा आहे. त्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाचा पेरा जवळपास 70 ते 80 टक्के झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात खर्च करून सुद्धा यावर्षी उत्पन्नात फार मोठी घट येण्याचा अंदाज आहे. कारण सोयाबीन पिकावर आ ळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पाहिजे तेवढी औषधी फवारणी करून सुद्धा या आळीवर कंट्रोल झाली नाही.


त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे या आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी केलेली आहे. कृषी खात्याने येऊन शेतकऱ्यांना या आळी बद्दल मार्गदर्शन करावे अशी इच्छा अनेक शेतकऱ्यांची आहे. कारण आळीच्या प्रादुर्भाव इतका भयंकर आहे की, कोणतीही कीटकनाशक फवारणी करून सुद्धा या अळचा प्रादुर्भाव थांबता-थांबेना यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


आणि आता सोयाबीनचे पीक ही नेमके फुलांमध्ये असल्यामुळे याचा जास्त परिणाम उत्पन्न वर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण जर सोयाबीनवर फुलांमध्ये जर आळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर, येणारे शेंग किडकी तयार होती, आणि उत्पन्नामध्ये फार मोठी घट येते.


मराठवाड्यामध्ये यावर्षी जास्त प्रमाणात सोयाबीनचा पेरा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी सुद्धा आळीच्या प्रादुर्भावामुळे चिंतेत सापडलेले आहे.


विदर्भामध्ये पहिल्यापासून सोयाबीनच्या पेरा 100% असतो. विदर्भात आळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे येथील शेतकरी सुद्धा परेशानी सापडलेली आहे.


पश्चिम महाराष्ट्र मध्ये सोयाबीनचा वेळ कमी असल्यामुळे, त्या भागात पन्नास टक्के सोयाबीन इतका पेरा झालेला आहे त्यामुळे तिथे आळी फारच कमी पडली आहे.

मराठवाड्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे?

मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजी नगर ,जालना,बीड, उस्मानाबाद, हिंगोली ,नांदेड, लातूर जास्त प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडलेले आहे. शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला या आळी बद्दल कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.


No comments:

Post a Comment

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...