महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
न्यूज बदलता महाराष्ट्र
देशातील स्त्रियांना दुर्मुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणी व तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्य मनात सुधारणा करून श्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे.
महाराष्ट्रात सध्या स्थिती प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जोडणी घेतलेल्या तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडणी असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडणीची पुनर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही तसेच, सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस घेणे परवडत नसल्यामुळे, एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाका करीत साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणाम येते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवीत असल्याची बाग शासनाच्या लक्षात आली आहे.
आणि आपल्याला महत्त्वाचे म्हणजे एक सांगायची गोष्ट अशी की वृक्षतोड केल्यामुळे निसर्गाची खूप मोठी प्रमाणात हानी होती. त्याचाच विचार करून शासनाने उज्वला गॅस योजना काढण्यात आली आणि गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची काम चालू केले.
सदर बाविचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सण 2024 ते 25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना [मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची] घोषणा करण्यात आली आहे. उपरोक्त गोष्टीच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल.
1. लाभार्थ्यांची पात्रता:-
- सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
- सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 52. 16 लक्ष लागत लाभार्थ्यांची सदर योजनेसाठी पात्र असतील.
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांची कुटुंब सदर योजनेस पात्र असेल.
- एका कुटुंबात (रेशन कार्ड नुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल.
- सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना उपलब्ध असेल.
No comments:
Post a Comment