Wednesday, August 7, 2024

पीएम विश्वकर्मा योजनेतून, जालना जिल्ह्यातून गवंड्याचे आणि शिंप्याचे 15 हजार अर्ज दाखल,

 मागील दोन तीन महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ,मे, आणि जून, जुलै या महिन्यामध्ये पीएम विश्वकर्मा योजनेतून विविध पारंपारिक व्यवसायासाठी फॉर्म बोलवण्यात आले होते.आणि जालना जिल्ह्यातून या योजानेसाठी विविध18,व्यवसायासाठी पंधरा हजार इतके अर्ज दाखल झाले आहे.

१८ पारंपारिक व्यवसाय


पीएम विश्वकर्मा योजनेतून विविध अठरा पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांची पुन्हा करणार पडताळणी.


न्यूज बदलता महाराष्ट्र:-

केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी आणि विविध योजनांना प्रकारच्या राबवत आहे. यात यात पंतप्रधान विश्वकर्मा योजना समाजातील विविध 18 व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांचा पारंपारिक व्यवसाय करताना अर्थसहाय्य व्हावी यासाठी राबवली जात आहे परंतु टेलर आणि गवंडी लाभार्थ्यांना प्रशिक्षण काळात प्रतिदिन पाचशे रुपयाची विद्यावेतन प्रमाणपत्र आणि साधने घेण्यासाठी लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी करून पंधरा हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे जालना जिल्ह्यातून अंदाज 15000 टेलर आणि गवंडीने अंदाजे 15000 अर्ज भरले आहे.


हे विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.  अर्जदाराच्या त्रिस्तरीय प्रधानमंत्री त्यांना योजनेचा लाभ दिला जातो ग्रामीण शहरी भागाच्या पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्राम विकास विभागाकडे शहरी भागात कार्यकारी अधिकारी प्रथम स्तरावरील पडताळणी करतात.


पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे काय?

पीएम विश्वकर्मा योजना समाजातील पारंपारिक व्यवसाय करण्यासाठी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत समाजातील सर्व जातींना प्रशिक्षणासह कमी व्याजदर कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अर्जदाराची निवड कशी होते?

1. अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिकांना मिळेल.

2. अर्ज करणारी व्यक्ती एकंदर कुशल कारागीर किंवा कारागीर असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांना प्रतिदिन किती पैसे मिळतात?

• या योजनेअंतर्गत महाभारतांना एक आठवड्यापर्यंत मात्र प्रशिक्षण दिले जातील. याकरिता त्यांना पाचशे रुपये प्रति दिन विद्या वेतन दिले जातील.

सोनार

लोहार

गवंडी

तेली

प्लंबर

हेल्पर

कुणबी

इलेक्ट्रीव्षण

सिंपी

कॅरपेन्तर

फ्द्ची कारागीर

धोबी

 

चांभार

नाव्ही

सुतार ,वेल्डर ,मेन्स ,विणकाम


https://www.amazon.com/stores/page/0BC77B41-0325-4CEF-915C-368B2CCF7AF0?&linkCode=ll2&tag=ravi094-20&linkId=7c815dcd821644370016e67a7aa62b1f&language=en_US&ref_=as_li_ss_tl






Tuesday, August 6, 2024

बैलांची शेतीची कामे संपल्याने बाजारात पशुधन विक्रीसाठी दाखल, भाव झाले कमी, बळीराजा आर्थिक अडचणीत

 शेतीची कामे आटपल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी मांडली आहे. त्यामुळे पशुधनाचे भाव कमी झाले आहे.

बैल बाजार 





बळीराजा आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले.


न्यूजबदलताना महाराष्ट्र:-

मराठी महिन्यातील, आखाड संपून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आणि या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले आहे. आणि त्या पाठोपाठ आता शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात झाली आहे.

त्यामुळे अनेकांनी दोन बैल सांभाळण्यासाठी एक व्यक्तीला वेळ द्यावा लागतो. म्हणून आठवडी बाजारात जीवापाड जपलेली बैल जोडी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या पाठोपाठ शेतकरी जास्त आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे त्यांनी आपली बैलजोडी बाजारात विक्रीसाठी मांडलेली आहे.

परंतु सध्या जनावरांना भाव नसल्याने एक लाखांना घेतलेली बैल जोडी रविवारच्या आठवणी बाजारात व्यापारी 75 ते 80 हजारांना मागितल्याचे एक शेतकऱ्यांनी सांगितले.

यांदा सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध झाला आहे. परंतु शेतीची कामे अंतिम टप्प्यात आल्यामुळे अनेक शेतकरी आपली जनावर विक्री करीत आहे यात जास्त कारण म्हणजे शेतकरी आर्थिक गर्जंद असल्यामुळे त्यांनी आपली बैलजोडी विक्रीसाठी काढली आहे. यात एक महेश 75000, तर गाय तीस ते पस्तीस हजारांना व्यापारी मागत असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे.

मशागतीसाठी मी जून महिन्यात बैलजोडी खरेदी केली होती मात्र आता शेतीची कामे संपत आली आहे. पिके ही जोमात आहेत त्यामुळे घेतलेली जनावरे विक्री करून पुन्हा पुढील वर्षी घेऊ, अशी शेतकऱ्यांची म्हणणे आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विक्री घेतली आहे, तर काहीजण ऊसतोड कामगार जेव्हा जातील, तेव्हा विक्री करत असल्याची व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे.

बाजारातील म्हशींचे भाव

म्हशीचे भाव 


75 हजार म्हशीचे भाव सध्या बाजारात चालू आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पशुधन असून, मोजक्या शेतकऱ्यांकडे आहे यात म्हशी पाळणाऱ्यांची प्रमाण खूप कमी आहे. आता प्रत्येक घरी दुधाचा वापर केला जातो एक महेश पंधरा ते पंचवीस लिटर दूध देते त्यामुळे चांगल्या जातीच्या एक म्हशीला बाजारात 75 हजारापेक्षा अधिक भाव मिळतो.


बाजारात सर्वाधिक विक्री विक्रेते शेतकरीच आहे, घेणारे फक्त व्यापारी आहे.

सध्या पेरणीची कामे संपली असून शेतकरीच जनावर विकत आहे त्यामुळे ही जनावर व्यापाऱ्या शिवाय दुसरे कोणीही घेत नसल्याने मागील त्या भावात शेतकऱ्यांना विकावी लागत आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे.

अनेक शेतकरी पोळ्याला बैल विकतात.

कारण अशी आहे की आता शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत तरी देखील अनेक शेतकरी आपल्या जवळ असलेली बैलजोडी विक्री करत नाहीअनेक शेतकरी पोळा सणापर्यंत कुटावर बैल ठेवतात त्यानंतर ऊसतोड कामगारांना बैलाची विक्री करतात आणि पुढील वर्षी पुन्हा मे व जून महिन्यात पुन्हा खरेदी करतात.

Monday, August 5, 2024

महाराष्ट्र मध्ये सोयाबीन पिकावर आळाईचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव/शेतकरी हवालधिल, कृषी खात्याने मार्गदर्शन करावे., अशी शेतकऱ्यांची मागणी

 महाराष्ट्र मध्ये जवळपास 70 ते 80 टक्के सोयाबीनची पेरणी झालेली आहे. आणि त्यामध्ये सोयाबीन वर जास्त प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव पायाला दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढलेली आहे.

 सोयाबीन पिकावरील  आळी







सोयाबीन पिकावर आळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंतेत.


न्यूजबदलता महाराष्ट्र:-

महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी खूपच जास्त पाऊस झाला आहे. आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये फारच कमी पाऊस अजून सुद्धा आहे. त्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाचा पेरा जवळपास 70 ते 80 टक्के झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात खर्च करून सुद्धा यावर्षी उत्पन्नात फार मोठी घट येण्याचा अंदाज आहे. कारण सोयाबीन पिकावर आ ळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पाहिजे तेवढी औषधी फवारणी करून सुद्धा या आळीवर कंट्रोल झाली नाही.


त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे या आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी केलेली आहे. कृषी खात्याने येऊन शेतकऱ्यांना या आळी बद्दल मार्गदर्शन करावे अशी इच्छा अनेक शेतकऱ्यांची आहे. कारण आळीच्या प्रादुर्भाव इतका भयंकर आहे की, कोणतीही कीटकनाशक फवारणी करून सुद्धा या अळचा प्रादुर्भाव थांबता-थांबेना यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


आणि आता सोयाबीनचे पीक ही नेमके फुलांमध्ये असल्यामुळे याचा जास्त परिणाम उत्पन्न वर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण जर सोयाबीनवर फुलांमध्ये जर आळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर, येणारे शेंग किडकी तयार होती, आणि उत्पन्नामध्ये फार मोठी घट येते.


मराठवाड्यामध्ये यावर्षी जास्त प्रमाणात सोयाबीनचा पेरा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी सुद्धा आळीच्या प्रादुर्भावामुळे चिंतेत सापडलेले आहे.


विदर्भामध्ये पहिल्यापासून सोयाबीनच्या पेरा 100% असतो. विदर्भात आळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे येथील शेतकरी सुद्धा परेशानी सापडलेली आहे.


पश्चिम महाराष्ट्र मध्ये सोयाबीनचा वेळ कमी असल्यामुळे, त्या भागात पन्नास टक्के सोयाबीन इतका पेरा झालेला आहे त्यामुळे तिथे आळी फारच कमी पडली आहे.

मराठवाड्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे?

मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजी नगर ,जालना,बीड, उस्मानाबाद, हिंगोली ,नांदेड, लातूर जास्त प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडलेले आहे. शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला या आळी बद्दल कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.


Friday, August 2, 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत, शासनाचा निर्णय/Anapurna yojna

 महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


न्यूज बदलता महाराष्ट्र





देशातील स्त्रियांना दुर्मुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणी व तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्य मनात सुधारणा करून श्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे.

महाराष्ट्रात सध्या स्थिती प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जोडणी घेतलेल्या तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडणी असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडणीची पुनर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही तसेच, सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस घेणे परवडत नसल्यामुळे, एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाका करीत साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणाम येते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवीत असल्याची बाग शासनाच्या लक्षात आली आहे.

आणि आपल्याला महत्त्वाचे म्हणजे एक सांगायची गोष्ट अशी की वृक्षतोड केल्यामुळे निसर्गाची खूप मोठी प्रमाणात हानी होती. त्याचाच विचार करून शासनाने उज्वला गॅस योजना काढण्यात आली आणि गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची काम चालू केले.

सदर बाविचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सण 2024 ते 25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना [मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची] घोषणा करण्यात आली आहे. उपरोक्त गोष्टीच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल.

1. लाभार्थ्यांची पात्रता:-

  • सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 52. 16 लक्ष लागत लाभार्थ्यांची सदर योजनेसाठी पात्र असतील.
  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांची कुटुंब सदर योजनेस पात्र असेल.
  • एका कुटुंबात (रेशन कार्ड नुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल.
  • सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना उपलब्ध असेल.


Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...