Monday, July 29, 2024

महाराष्ट्र राज्यात 11 ऑगस्ट पासून छत्रपती संभाजी नगर मध्ये अग्नी वीर भरती

 जळगाव, जालना ,बुलढाणा ,हिंगोली ,नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांसाठी सुद्धा भरती.


न्यूजबदलता महाराष्ट्र:- 



छत्रपती संभाजीनगर; येथील आर्मी भरती बोर्डाच्या वतीने 11 ते 23 ऑगस्ट दरम्यान अजमेर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्या भरती परीक्षेत सहभागी होता येणार आहे पात्र उमेदवारांना त्यांच्या ई-मेल वर या भरती मेळाव्याची प्रवेश पत्र पाठवण्यात आली ची भरती प्रक्रियेची संचालक कर्नल अनुज सिंगल यांनी सांगितले.

राज्यातील छत्रपती संभाजी नगर बुलढाणा हिंगोली जळगाव जालना नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आहे.
विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जिल्हा न्याय आणि संबंधित तारखेस उपस्थित राहण्याची आवाहन करण्यात आली आहे 11 ऑगस्ट रोजी असिस्टंट स्टोर कीपर आणि टेक्निकल कॅटेगिरीतील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांना तसेच परभणी जिल्ह्यातील अग्नीवीर जनरल ड्युटी उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची , प्रवेश आणि फिंगरप्रिंट स्कॅनिंग नंतरच प्रवेश मिळणार आहे.


1. उमेदवारांनी सोबत प्रवेश पत्र आणावे .या प्रवेश पत्राच्या आधारित त्यांच्या बोटाची स्कॅनिंग केल्या जाईल .यानंतरच त्यांना शारीरिक आणि मेडिकल चाचणीसाठी प्रवेश दिला जाईल.


2. या चाचणीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची सप्टेंबर महिन्यात मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.


अग्निवीर भरती घेण्यासाठी जिल्हा निहाय यादी.

11ऑगस्ट. 

परभणी 

12 ऑगस्ट. 

नांदेड 

13 ऑगस्ट. 

छत्रपतीसंभाजीनगर(संभाजीनगर ,गंगापूर ,कन्नड, खुलताबाद) 

14 ऑगस्ट. 

छत्रपती संभाजी नगर (पैठण, फुलंब्री ,सिल्लोड, सोयगाव, वैजापूर) 

15 ऑगस्ट. 

जळगाव (अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव ,मुक्ताईनगर) 

16 ऑगस्ट. 

जळगाव(बोदवड, चोपडा, धरणगाव ,एरंडोल, जळगाव ,जामनेर आणि पाचोरा) 

17 ऑगस्ट. 

जळगाव (पारोळा, रावेर ,आणि ,यावल) 

17 ऑगस्ट. 

जालना (बदनापूर, भोकरदन, घनसावंगी आणि जालना तालुका) 

18 ऑगस्ट. 

जालना, अंबड ,जाफराबाद ,मंठा आणि परतुर) 

18 ऑगस्ट. 

हिंगोली (संपूर्ण जिल्हा) 

19 ऑगस्ट.   

बुलढाणा,चिखली,देऊळगाव राजा,जळगाव जामोद खामगाव,लोणार,मलकापूर,मेहकर,मोताळा,नांदुरा, संग्रामपूर शेगाव ,आणि सिंदखेड राजा) 

20 ऑगस्ट. 

सर्व जिल्ह्यातील अग्नीवर टेक्निकल अग्निविर ट्रेडमन आठवी पास या पदाच्या उमेदवारांनी हजर राहावे. 

21 ऑगस्ट. 

सर्व जिल्ह्यातील अग्नी वीर ट्रेडसमन दहावी पास या पदाच्या उमेदवारांनी उपस्थित राहावे 

 

टीप:-ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या भरती परीक्षेत सहभागी होता येणार आहे.

https://amzn.to/3YPYEvh

No comments:

Post a Comment

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...