Tuesday, July 23, 2024

आषाढी यात्रेची सांगता/साधू संतांच्या पालख्या प्रतीच्या मार्गाला/थोडक्यात बातमी

  एकादशीला आलेल्या साधू संतांच्या पालख्या आज परतीच्या मार्गाला निघाल्या आहे.


महाराष्ट्र न्यूज

पंढरपूर; गोपाळकाला गोड झाला, गोपाळ आणि गोड केला, या जयघोषात अवधी श्रीकृष्ण नगरी म्हणजेच गोपाळ नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमली गेली, ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरा मानाच्या पालखी असेल सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाची दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या.
आषाढी यात्रेची सांगता



मनाच्या पालखी आणि श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपुरा येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली.


त्यानंतर भजन झाली शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीची पहाटे चार वाजता गोपाळपुरात आगमन झाली.

पहाटेपासूनच एका मागोमाग एक अशा विविध सुमारे संतांच्या चारशे दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या. सकाळी नऊच्या सुमारास सद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर साडेनऊच्या सुमानासंत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गोपाळपुरा दाखल झाली.

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकाची पूजन करण्यात आली मंदिराजवळ पालख्या विसरल्या होत्या या पालखीचे संत सोपान काका संत मुक्ताबाई संत नामदेव महाराज संत गोरोबा संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत निंभोराय संकटेश्वर संस्थान यांच्यासह माननीय संतांच्या पालख्यांची व दिंड्यांची गोपाळपुरात आगमन झाले.

शुक्रवारला प्रक्षाळ पूजा.
पंढरपूर येथील आषाढी यात्रेत दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी माता नवरात्र उभे असतात. श्री विठ्ठलाचे नवरात्र असल्याने पलंग काढलेला असतो. येत्या शुक्रवारी श्रींची प्रक्षाळ पूजा करण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.


संत आणि देव भेटीचा सोहळा.

गोपाळकाला झाल्यानंतर मानाच्या सर्व पालक या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्या. संतांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या. देवाची आणि संतांची अनुप भेट घडून आणण्यात आली. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यावर हा संत देव भेटीचा सोहळा झाला.

No comments:

Post a Comment

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...