Tuesday, July 23, 2024

महाराष्ट्रात तुरळक जिल्ह्यात जास्त पाणी, तर अर्ध्या महाराष्ट्रात कमीच पडला पाणी

 मुसळधार पावसाने राज्यातील धरणांचा पाणीसाठा 560.39 टीएमसी, सर्वात कमी 12 टक्के पाणीसाठा मराठवाड्या विभागात


न्यूज बदलता महाराष्ट्र


महाराष्ट्र; राज्यात पावसाने आतापर्यंत सरासरी ओलांडली असून एकूण पाऊस 123% अर्थात 545 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत 422 मिलिमीटर अर्थात 95 टक्के पाऊस झाला होता.

या पावसामुळे राज्यात पाणी साठा वाढतही भरघोस वाढ झाली असून राज्यात एकूण पाणीसाठा 560.39 टीएमसी अर्थात 39.17% वर गेला आहे. पण मात्र महाराष्ट्रातील पावसाने दांडी मारलेली आहे. व अर्ध्या महाराष्ट्रातील धरणी अजून कोरडी पडलेली आहे.


गेल्या वर्षी याच तारखेला राज्यात 43.65 टक्के पाणीसाठा होता. संभाजीनगर विभागात म्हणजेच मराठवाड्यात सर्वात कमी 12 टक्के पाणीसाठा आहे. राज्याची 22 जुलै पर्यंत सरासरी पाऊस ४४२.४ मिलिमीटर पडतो.


राज्यात सध्या कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस होत आहे. भंडारा गोंदिया व पालघर या तीन जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील या तीन जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे येथील जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले होते. एकूण पंधरा जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.


19 जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कोल्हापूर मधील पंचगंगा नदीची इशारा पातळी ओलांडल्यामुळे राजाराम बंधारा परिसरात हिराची पाणी अशी विस्तार पसरली आहे की तेथील जनजीवन सुद्धा विस्कळीत झाली आहे.


नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने नाशिक सह मराठवाड्याची तहान भागवण्याच्या गंगापूर धरणातील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे वाढला नाही सध्या या धरणात केवळ 44% इतकाच पाणीसाठा आहे.

राज्यातील सर्वाधिक 119% पाऊस सोलापूर जिल्ह्यात झाला आहे.


राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 119% अर्थात 324.6 मिलिमीटर पाऊस सोलापूर जिल्ह्यात नोंदविण्यात आला आहे. त्या खालोखाल सांगली जिल्ह्यात 386 पॉईंट 58 ते 172 पॉईंट 58% पाऊस झाला आहे.


महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पावसाची सरासरी टक्केवारी.






No comments:

Post a Comment

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...