Monday, July 22, 2024

महाराष्ट्र मध्ये पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम, अर्ध्या महाराष्ट्रा कोरडा

 पूर्व विदर्भात लोकांची घरे रस्ता पाण्याखाली गेली आहे जनजीवन विस्कळीत झाली आहे. तीन जिल्ह्यांचा संपर्क तुटला. मराठवाड्यात पावसाचा तुटवडा.

महाराष्ट्र मध्ये पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम




महाराष्ट्र न्यूज; तीन दिवसापासून विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून अतिवृष्टीमुळे रविवारी गडचिरोली चंद्रपूर व गोंदिया पूर परिस्थिती निर्माण झाली.

अनेक गावांचा संपर्क तुटला पुलावरून पाणी साचल्याने महामार्ग बंद पडली गावांची संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. असे असले तरी निम्म्या विदर्भात सह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तील अनेक जिल्ह्यात सर्व दूरदर्शन प्रतीक्षा कायम आहे.

चंद्रपूर मध्ये तलाव फुटुन तीनशे घरात पाणी शिरले.


गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पाऊस मुसळधार पावसामुळे पैनगंगा या नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले चंद्रपूर तालुक्यातील मामा तलावाची बाळू फुटल्याने तीनशे घरात पाणी शिरले जिल्हा प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.



पावसाच्या पुरामुळे 37 रस्ते गेले पाण्याखाली आणि नागपूर, चंद्रपूरची संपर्क तुटला.


गडचिरोली. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे गडचिरोली चा नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याची संपर्क तुटला असून चार राष्ट्रीय महामार्गासह 37 रस्त्यांची रहदारी सध्या बंद आहे भामरगडला पुराचा सर्वाधिक फटका बसला आणि दुकाने आणि ग्राम मध्ये पावसाची पाणी शिरले आहे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. निम्मी गडचिरोली शहर पाण्याखाली गेली पूर परिस्थितीमुळे 22 जुलैला जिल्ह्यातील सर्व शाळांना महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.



पंचगंगा नदीकाठच्या गावांची स्थलांतराची तयारी सुरू केली आहे तेथील प्रशासन सज्ज.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला परिणामी पंचगंगा नदी 37 फुटाच्या वरून वाहू लागली पाण्याच्या विसर्जनामुळे नदीकाठच्या गावांना संपर्क तिचा इशारा देण्यात आला असून स्थलांतराची तयारी तेथे प्रशासनाने सुरू केली आहे काही तालुक्यांच्या ढगफुटी सारख्या पाऊस कोसळत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील 33 मार्ग पुरामुळे बंद झाली रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचवली तालुका खेड येथील रामचंद्र सखाराम पवार ही गुरुवारी इथून वाहून गेले होते शनिवारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.


महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा.

महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे अजून सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जवळपास अर्धा महाराष्ट्र पावसाने झोडपून काढला आहे.
हवामान विभागाच्या पावसाच्या अहवालानुसार, अमरावती येथे बारा टक्के तर गोंदिया जिल्ह्यात अकरा टक्के पावसाची तूट आहे.
पुरविदर्भात पावसाचा जोर असला तरी अकोला ,बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात प्रतीक्षा कायम आहे.

मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या अर्धा म्हणजेच 337.2 मि मी पावसाची नोंद झाली आहे. ही जिंकी 20 जुलै 50 दिवसाच्या कालावधी 59 टक्के पाऊस झाला असताना जिल्ह्यातील मोठी धरणे अद्याप कोरडी आहे अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्यामुळे पिकांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.


कृष्णा नदीची पातळी 18 फुटावर गेली आहे.

काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली रविवारी सांगलीतील नदीच्या पातळीत 18 फुटावर गेली होती.

कोयना धरणात 54 टक्के पाणीसाठा
24 तास कोयना धरणात साडेतीन टीएमसी पाणी साठा वाढला त्यामुळे सध्या 54.5 टीएमसी पाणीसाठा झाला.

कोकणातील सिंधुदुर्गात 20 धरणे भरली.
हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्या तुरुंग भरून वाहत आहे तिलारी मुरली सातडी देवघर या प्रमुख धरणातून विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 20 धरने  पूर्ण भरली आहे.


No comments:

Post a Comment

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...