Thursday, June 20, 2024

आता पांढरे शुभ्र- शिधापत्रिका धारकांना सुद्धा मिळणार- पाच लाखापर्यंत मोफत- उपचार/white- ration card Sathi- good news!

 महाराष्ट्र; पांढरे रेशन कार्ड असलेल्या व्यक्तींना, कुटुंबांना पांढरे शुभ्र शिधापत्रिका धारकांना सुद्धा पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.

white ration card Sathi good news!
white- ration card


white ration card Sathi good news!

Mumbai; संपूर्ण भारतभर चालू असलेल्या आयुष्यमान भारत योजना, ही भारतातल्या प्रत्येक कुटुंबासाठी भारत सरकारने ही योजना लागू केलेली आहे. त्याचपाठोपाठ महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. योजना पांढरे शुभ्र शिधापत्रिका धारकांना सुद्धा लागू करण्यात आली आहे.

व भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ही सुद्धा पांढरे शुभ्र शिधापत्रिका धारकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेण्यासाठी लागू करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्मान सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते.


यांच्यात तयारीला सुरुवात झाली असून पांढरे शुभ रेशन कार्डधारकांना महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

शुभ्र शिधापत्रिका धारकांना कार्ड सोबत संलग्न करण्याबाबतची आदेश जारी करण्यात आले आहे. यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिरा वाटप यांना रेशन कार्ड चे आधारशी जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2019 च्या शासन निर्णयान्वयी महात्मा ज्योतिराव फुले वजन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


यामध्ये 2023 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानुसार, आरोग्य विमा योजनेचा लाभ हा शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांनाही देण्यात येणार आहे.


आयुष्मान भारत योजनेबद्दल!




1) आयुष्मान भारत ची घोषणा भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2018 मध्ये केली आहे, ज्याचे दोन मुख्य स्तंभ आहेत, देशात एक लाख आरोग्य आणि निरोगीपणा केंद्र उभारणी आणि पति वर्षी पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा प्रदान करणे. दहा कोटी कुटुंबांना जोडण्यासाठी


आयुष्मान भारत योजनेची मुख्य माहिती पुढील प्रमाणे पाहूया.


या योजनेत सामाजिक आर्थिक जात जनगणना मध्ये ओळखल्या गेलेल्या D1, ते D7 पर्यंत, D6 वगळता, वंचित ग्रामीण कुटुंबीयांनी व्यवसाय आधारित शहरी कुटुंबांचा समावेश असेल. तसेच, लिंबाच्या काही सैनिक आपोआप समाविष्ट केले जातील.


आयुस्मान  भारत मिशन अंतर्गत पंतप्रधानांच्या राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत सामाजिक आर्थिक जात जनगणना (SECC) मध्ये ओळखल्या गेलेल्या लाभार्थी व्यतिरिक्त एमपी, मराठा पात्र स्लिप आणि संघटित क्षेत्रातील कामगारांचाही अन्नसुरक्षित समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आगामी काळात इतर योजनेचे लाभार्थी किंवा समाजातील इतर घटकांचा या योजनेत समावेश करण्याचा विचार केला जाईल.






Monday, June 17, 2024

प्रधानमंत्री पिक- विमा योजना -अंतर्गत पुनर्रचित-हवामान आधारित- फळ पिक- विमा -योजना 2024

 महाराष्ट्र शासन: कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक:81/10



प्रधानमंत्री पिक विमा योजना२०२४
2024




प्रधानमंत्री पिक विमा योजना 

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीमध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकाची बाजार मूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो .ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने मदत होईल.


भारत सरकार सर्व समावेशक  1999 ते 2000 मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना किंवा राष्ट्रीय योजना आर के बी y नावाची नवीन योजना सुरू केली सर्वांना धान्य पिके बागायती आणि या व्यवसायिक पिके याचा कल्पना करते.

 अर्जदार, बिगर कर्जदार ,अशा शेतकऱ्यांचा समावेश होता. नंतर त्या पाठोपाठ फळ पिक विमा योजना, सरकारने त्याची अंमलबजावणी चालू केली. 

शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार. योजनेअंतर्गत प्रत्येक राज्याने जास्तीत जास्त तीन वर्षाच्या कालावधीत विम्याची एक एक म्हणून स्तर ग्रामपंचायत पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

 भारतीय कृषी विमा महामंडळ योजना राबवत आहे या योजनेची जागा , प्रधानमंत्री फळ पिक विमा योजने घेतली आहे.


विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊ मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते.


पर्याय नि शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुस्कान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविणे शासनाच्या विचाराधीन होते.



पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना मुर्ग बहार संत्रा ,मोसंबी ,काजू ,डाळिंब, आंबा, केळी ,द्राक्ष प्रायोगिक  तत्वावर  स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्याचे प्रस्तावितआहे.

 हवामान आधारित फळ पिक विमा योजना 2024



प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2024 ते 25 व 25 ते 26 या दोन वर्षासाठी मुर्ग बहार संत्रा, मोसंबी ,डाळिंब ,चिकू, पेरू, लिंबू ,सीताफळ व द्राक्ष या आठ फळ पिकांसाठी व अंबिया बहार संत्रा ,मोसंबी ,काजू ,डाळींब ,आंबा ,केळी ,द्राक्ष परयोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नवीन पिकांसाठी लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.


राज्यात अधिसूचित फळ पिकांखा खालील वीस हजार हेक्टर व त्यापेक्षा जास्त उत्पादनात क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त प्रस्तावनानुसार ,महसूल मंडळ यादी सूचित करण्यात आली आहे.


योजनेचे उद्दिष्ट


1)नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.


2)पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य अबाधित राहणे.

3)शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.

4)कृषी क्षेत्रासाठी पुरवठ्यात सातत्याने राखणे, जेणेकरून उत्पादनातील जखमीपासून शेतकऱ्यांच्या रक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकाची विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक कथेची वाढ ही हेतू साध्य करणे.


हा पिक विमा कुठे भरायचा? याबद्दल थोडे जाणून घेऊया!



प्रधानमंत्री फसल बीमा योजना, व हवामान आधारित फळपीक विमा योजना. या योजना आपण आपल्या गावातील सीएससी सेंटरवर सुद्धा भरू शकता. 

आणि जर आपल्याला स्वतः पिक विमा भरून शकता येतो. त्यासाठी आपण स्वतः पीक विम्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा पिक विमा भरू शकता. 

आणि जर आपल्याला सीएससी सेंटरवर सुद्धा जाऊन तुम्ही हा पिक विमा अर्ज करू शकता म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर हे आपल्या सेवेसाठी भारत सरकारने आपल्या गावामध्ये आपल्या मदतीसाठी व अचूक माहिती देण्यासाठी चालू केलेले एक साधारण म्हणजेच भारत सरकार द्वारे पुरस्कृत सीएससी सेंटर आपण येथे जाऊन आपण हा पिक विमा भरू शकता.


आता आपण थोडक्यात, अंमलबजावणी करणारी संस्था बघूया!


कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि संबंधित राज्य यांच्या समन्वय आणि संपूर्ण मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली निवडलेल्या विमा कंपन्या द्वारे बहु एजन्सी फ्रेमवर्कद्वारे ही योजना चालू केली जाईल.

 इतर विविध एजन्सी सह, व्यापारी बँका. सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि त्यांच्या नियमित संस्था, सरकारी विभाग यासारख्या वित्तीय संस्था, तसेच आपल्या गावातील CSC सीएससी कॉमन सर्विस सेंटर म्हणजे आपले सरकार केंद्र यावर जाऊन सुद्धा अंमलबजावणी केली जाते.

आता शेतकऱ्यांची कव्हरेज.

हंगामात अधिसूचित क्षेत्रामध्ये अधिसूचित पिके घेणारे किंवा फळपीक घेणारे हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा, सर्व शेतकरी याची पीक विमा पात्र आहेत ते पात्र आहेत याची कव्हरेज 2020 खरीप पासून नाव नोंदणी शंभर टक्के केली जाते.

आता यामध्ये पीक विमा कंपन्यांची यादी.

कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने भारतीय कृषी विभाग कंपनी AIC आणि सध्या काही खाजगी विमा कंपन्यांना त्याची आर्थिक ताकद, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि कौशल्य इत्यादीचा आधारावर सरकार प्रायोजित कृषी पीक विमा योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी नियुक्त पॅनल केली आहे.

 सध्या पॅनल केलेल्या विमा कंपन्या, म्हणजेच सरकारच्या अधिकृत कंपन्या त्यामुळे आपला पिक विमा भरण्यासाठी वापर केला जातो.
  • भारतीय कृषी विमा कंपनी
  • ICICI आयसीआयसीआय 
  • एचडीएफसी ERGO जनरल इन्शुरन्स कंपनी
  • इको टोकियो जनरल इन्शुरन्स
  • चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स
  • बजाज आलियांश जनरल इन्शुरन्स
  • रिलायन्स जनरल इन्शुरन्स
  • फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स
  • TATA AIG जनरल इन्शुरन्स
  • SBI जनरल इन्शुरन्स
  • युनिव्हर्सल सॅम्पल जनरल इन्शुरन्स

वरील दिलेल्या कंपन्या या शासनातर्फे अधिकृत कंपन्या घोषित करण्यात आल्या आहे.



Tuesday, June 11, 2024

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी/ PM किसानचा 17वा हप्ता लवकरच वितरित होणार.

 PM Kisan; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी 17व्या हप्त्याचे लवकरच वितरित होणार असल्याचे सांगितली आहे.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. ही भारतातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये 2000 च्या हप्त्यामध्ये दिली जाते. या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक लाभ म्हणजेच शेतीसाठी लागणारी खत ,बी बियाणे कीटकनाशके घेण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.


PM -Kisan Samman Nidhi

                 PM -Kisan Samman Nidhi 

 



   पी एम किसान सन्मान योजना

  `PM -Kisan Samman Nidhi ,वर्षातून प्रत्येकी तीन हप्ते ,पी एम किसान सन्मान निधी हा शेतकऱ्यांना देण्यात येतो. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्याचा पहिला आदेश दिला आहे.


सायंकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावून प्रधानमंत्री आवास योजनेची बजेट वाढवून तीन कोटी नवीन घरे देण्यास मंजुरी देण्यात आली.


 PM किसानचा 17वा हप्ता लवकरच वितरित होणार.

मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या दिवसापासून पूर्ण ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी पीएम किसान सन्मान निधीचा 17वां आत्ता जारी करण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी केली.


पंतप्रधानाच्या स्वाक्षरीनंतर 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या`  PM -Kisan Samman Nidhi , किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. किसान सन्मान निधीचा हा, सतरावा हप्ता असेल. 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अंदाजे दोन हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले जातील.
                                        

शेतकऱ्यांची जीवन सुखकर करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे मोदींनी स्वाक्षरी केल्यानंतर म्हटले.


किसान सन्मान निधीचे प्रत्येकी, 2000 रुपयाची तीन हप्ते दरवर्षी शेतकऱ्यांना दिले जात आहेत.

त्यावर केंद्र सरकार 6हजार कोटी रुपये खर्च करतात.

ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान चे पैसे मिळत नाही त्या शेतकऱ्यांनी काय करायचे आहे?

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा, कोणताही हप्ता आतापर्यंत मिळाला नसेल तर, त्यांनी सदरील जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन ,आधार कार्ड ,बँक पासबुक, पॅन कार्ड सोबत घेऊन जाणे व आपली आधार प्रमाणिकरण म्हणजेच, डीबीटी लिंक करून घेणे. अन्यथा आपल्याला पी एम किसान ,सन्मानिधीचे कोणताही हप्ता मिळणार नाही. 


आणि ज्या शेतकऱ्यांना काही हप्ते मिळाली, तर काही मिळाले नाही, आणि मध्येच बंद पडली, त्यांनी सुद्धा पी एम किसान सन्मान निधीची केवायसी करून घेणे बंधनकारक आहे. आणि ,आधार सीडी करून घेणे, गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार सलग बँक खाते उघडले नसेल तर, त्यांनी राष्ट्रीयकृत कोणत्याही ,बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे.


 जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ,पीएम किसान सन्मान निधीचे पूर्ण हप्ते शेतकऱ्यांपर्यंत व किंवा शेतकऱ्याला प्राप्त होईल. जो शेतकरी बँक  ,आधार मॅपिंग करणार नाही त्याला सुद्धा ही पैसे म्हणजेच ,पीएम किसान सन्मान निधी योजना मिळणार नाही.


माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान या योजनेचा शुभारंभ त्यांनी, शेतकऱ्यांच्या आर्थिक व शेतीसाठी लागणाऱ्या ,भांडवलासाठी ही योजना म्हणजेच ,पीएम किसान सन्मान निधी योजना ,चालू केली आहे.

योजने बद्दल थोडक्यात माहिती !



जर कोणी शेतकरी वंचित राहत असेल ,या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे आपण खाली सविस्तर पाहणार आहोत.

ज्या शेतकऱ्याला पी एम किसान योजनेसाठी अर्ज करायचा आहे ,भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्याकडे किमान दोन हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे तोच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.

ज्या शेतकऱ्याकडे आधार कार्ड व त्या आधार काढला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तो शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.

जो शेतकरी आयकर भरत असेल तर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर शेती वगळता एखाद्या व्यवसायाचा इन्कम टॅक्स भरत असेल तर तो शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही.

शेतकऱ्यांनी वरील माहिती लक्षात घेणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा?



एम किसान योजनेसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतो, साठी आपल्याकडे आधार कार्ड, असणे आवश्यक आहे.

अर्ज हा ऑनलाइन सुद्धा करण्यात येतो, एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, व त्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचा सातबारा उतारा  आवश्यक आहे.

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करावा, आणि सोबत आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा नेणे आवश्यक आहे.

ही योजना कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही?

पी एम किसान सन्मान निधी योजना, दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याच पाठोपाठ जे शेतकरी आयकर रिटर्न भरतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

जे शेतकरी शेती व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही बिझनेस मध्ये जीएसटी भरत असेल तर, त्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही.

जे शेतकरी म्हणजेच नोकरी करत असतील तर त्यांना हा पीएम किसान सन्मान निधीचा हप्त्यासाठी अपात्र आहे. पी एम किसान सन्मान निधीचा लाभ नोकरदार वर्गाला मिळणार नाही. 

नोकरदार वर्गांनी नोकरी आणि शेती करत असतील तर त्यांनी पीएम किसान साठी अर्ज करणे शक्यतो टाळावा. अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

 व त्याचा अर्ज बाद करण्यात येईल. व त्याने जर काही नजर चुकीने अर्ज दाखल केला असेल तर, व काही पी एम किसान चे पैसे मिळाले असतील तर, त्या नोकरदार वर्गणी ते पैसे परत ऑनलाईन भरणा करावा. जर पैसे परत नाही केल्यास, त्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते.


शेतकऱ्यांना या योजनेपासून नेमके कोणते फायदे होणार आहे?

पी एम किसान सन्मान निधी, या योजनेची फायदेशी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल.

शेतीसाठी आवश्यक साधनाची खरेदी करण्यासाठी, किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यापर्यंत पोचली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.

आणि शेतकऱ्यांना शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी, शेतकऱ्यांची आर्थिक बाजू जास्त प्रमाणात वाढेल यासाठी या योजनेचा लाभ दिला जातो.

अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकता.

शेतकऱ्यांना योजनेपासून वर्षाला म्हणजेच बारा महिन्याला सहा हजार रुपये मिळणार असल्याने, शेतकरी या पैशावर आपले शेती उपयोगी वस्तू खरेदी करू शकतात, आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक ,अडचण दूर करू शकतो. पी एम किसान सन्मान ,निधी ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक साक्षरता बनवण्यासाठी व शेतीसाठी बहुउपयोगी वस्तू, मिळवण्यासाठी या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. जे शेतकरी आर्थिक ,अडचणीत सापडतात त्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी ,योजना खूप फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण निर्माण झाले आहे. कारण शेतीला लागणाऱ्या बहुउपयोगी वस्तू, या योजनेमुळे विकत घेण्यास आर्थिक अडचण दूर होत आहे, त्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.

एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट द्या. www. pm kisan.gon.in


टीप :

योजनेची संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी, पी एम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा.1800-115-5266

योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, गिरणीच्या पात्रता आणि कशाची काळजीपूर्वक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. नंतरच तुम्ही अर्ज करू शकता.










Monday, June 10, 2024

मुंबईत मान्सून- वेळे-आधीच दाखल/Monsoon -update 2024

 

Monsoon -update 2024☔☔☔

   

महाराष्ट्र; तळ कोकणात रिंगाळलेला मान्सून रविवारी मुंबईत दाखल झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि परिसरात 14 तारखेपर्यंत पावसाचा जोर काहीसा अधिक राहील, असा अंदाज आहे.



महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज ⛈⛈⛈⛈


नैऋत्य मान्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर नांदेड पर्यंत पोहोचली, असून उर्वरित महाराष्ट्र तो व्यापेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान राज्यांमध्ये काही भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

                                                

मुंबई सह रायगड, ठाणे, पुणे ,अहमदनगर, बीडमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.


दरवर्षीच्या तुलनेत मान्सून मुंबई दोन दिवस आधीच दाखल झाला. साधारणपणे मान्सून मुंबईत 11 जूनला दाखल होतो. मात्र दोन दिवस आधीच म्हणजे ,नऊ जूनला मुंबई त्याचे  आगमन झाले.



मे महिन्यात उष्णता इतकी वाढली की गेल्या अनेक वर्षाचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. त्यातच मान्सून लवकर दाखल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Monsoon -update 2024 ⛈⛈


Monsoon; उन्हामुळे त्रस्त झालेले लोक आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत . उष्णतेमुळे लोक हेरान झाली आहेत. त्यातच मान्सून बातमी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण केरळमध्ये दरवर्षी पेक्षा यंदा दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. साधारणपणे मान्सून एक जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. त्यानंतर पाच जून पर्यंत तो ईशान्य भारताच्या बहुतांशी भागात पोहोचतो. भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा पहिला पाऊस एक जून रोजी येईल असा अंदाज वर्तवला होता, परंतु 28 मे रोजी केरळमध्ये पाऊस झाला. महत्वा ची माहिती यावर्षी उष्णतेने कहर केला आहे. अकरा वर्षाचा विक्रम यंदा मोडला गेला आहे. उत्तर भारतात तर तापमान पन्नास अंशाच्या वर गेले आहे.


Monsoon -update 2024,पण मान्सूनची यावर्षी लवकर आगमन झाले ,असल्याने. नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व थोडेफार का होईना गर्मीपासून हळूहळू सुटका व्हायला सुरुवात झाली आहे. यावर्षी उष्णता जास्त असल्यामुळे मान्सून दोन दिवस लवकर आल्याने आनंदाची वातावरण निर्माण झाले आहे.


Monsoon -update 2024,आता हळूहळू महाराष्ट्राचा काही भाग मान्सून व्यापला गेला आहे. लवकरच काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन होईल असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.


शेतकऱ्यांनी पेरणी केव्हा करावी?󠀤󠀶󠁊



शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये ,अर्धवट पाऊस झाल्यावर जर पेरणी केली तर, आपले शेतकऱ्यांची महागाची बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. शेतकऱ्यांनी चांगला शंभर मी ,Monsoon -update 2024,पाऊस झाल्याच्या नंतर व जमिनीत चांगल्या प्रकारे ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करावी अन्यथा पेरणी करू नये.


शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व जमीन तयार करणे गरजेचे आहे. कारण मान्सून हळूहळू पूर्ण राज्यातील त्यासाठी त्यांनी पूर्व जमीन तयार करणे.


माती तयार करणे ही वाढवण्याची पहिली पायरी आहे. माती ढवळून आणि सहल करून विस्तृत प्रवेश मिळवता येतो. मातीतील असंख्य जिवाणू, गांडूळ इत्यादीची वाढ, व जनावरांचा शेणखत ही टाकली शेतीसाठी उपयुक्त ठरते.


जी मातीला बुरशी आणि इतर आवश्यक पोषण तत्व आणि समृद्ध करतात. माती सेल केल्याने सुलभ होतील. माती तयार करण्याच्या तीव्र प्रक्रिया खालील प्रमाणे आपण आता सांगणार आहोत.


नांगरणी: नांगरणी ही नेहमी, आपण उन्हाळ्यामध्ये पेरणी करण्या अगोदर आपण नागरिक करणे आवश्यक आहे कारण आपली जमीन उत्कृष्ट प्रमाणात जपून याची उत्कृष्ट प्रमाणात मशागत करून घेणे कारण यावर्षी मान्सून आगमन लवकर झाल्यामुळे पेरणी ही लवकर होणार आहे.



शेतातून पण आणि इतर अवचित वस्तू काढून टाकण्यासोबतच नागरणीमुळे खूप कमी प्रमाणात तन व इतर गवत शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर उगवत नाही.


जमीन सपाटीकरणाद्वारे जमिनीचा पृष्ठभाग सपाट केला जातो हे पाणी टिकवून ठेवण्यास उत्पादन सुधारण्यासाठी माती अधिक सक्षम करते. जे एक मोठा आणि हे पृथ्वी समतोल करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. शेताची सपाटीकरण करून संजना दरम्यान पाणी वाटप शेती होते. माती तयार करण्याचा शेवटचा टप्पा आहे.


आणि त्यानंतर लगेच मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे पेरणी करू शकतो.

यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असून, शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करून ठेवणे कारण यावर्षी माणसं महाराष्ट्रामध्ये आगमन होणार आहे, आणि लवकरच काही जिल्ह्यांमध्ये आगमन होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी चांगलं उत्कृष्ट प्रकारची बी बियाणे व खते. प्रसिद्ध कंपनीचे खाते वापरणे म्हणजेच आपल्या शेतीला पिकवणे खूप फायदेशीर ठरते.


भारत हा कृषिप्रधान देश असून भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज यंत्र प्रत्येक मंडळा व तालुक्यात व जिल्ह्यात बसवली आहे. प्रत्येक तालुक्यातील कृषी कार्यालयात जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी हवामानाविषयी अंदाज घेणे गरजेचे आहे.


महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावासाठी एक कृषी सेवक व असे अनेक कृषी अधिकारी निवडले जाते. आपण कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन हवामान अंदाज घेऊ शकता. आणि हवामान विषय व पेरणी विषयी कृषी अधिकारी बरोबर त्यांना विचारपूस करू शकता. की आमच्या तालुक्यात किती टक्के सरासरी यावर्षी पाऊस पडणार आहे त्यानुसार आपण भिजवाई निवडावी व त्यानुसार पेरणी करावी.


हवानात जर काही बदल झाल्यास आपल्याला आमच्या ब्लॉग च्या माध्यमातून योग्य ती माहिती वेळेवर मिळेल.


आणि योग्य तो शेती विषयक बातम्या व इतरही बातम्या आपल्याला या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. या ब्लॉगचा उद्देश हवामानाविषयी बातम्या व जनरल बातम्या इतर काही बातम्या यासाठी आपण या ब्लॉगला दररोज भेट देणे आवश्यक आहे आम्ही आपल्यापर्यंत अचूक माहिती आवश्यक पोहोचवण्याचे काम करू. न्यूज बदलता महाराष्ट्र.

Saturday, June 8, 2024

भारतात, गेल्या- मे महिन्यात सर्वाधिक- ताम्मानाची लाट !

भारतात- मे महिन्यात जाणवलेली भयंकर उष्णतेची लाट आतापर्यंतच्या सर्वात उष्णतेच्या लाठीपेक्षा दीड अंश सेल्सिअसने जास्त उष्ण होती, असे हवामान शास्त्रज्ञ आणि संशोधकाच्या एका स्वतंत्र गटांनी केलेल्या नव्या माहिती अभ्यासात समोर आले आहे. हवामान संशोधकांनी सांगितलेल्या की, मे महिन्यात भारतात आलेली तीव्र आणि प्रदीर्घ उष्णतेची लाट, अल निनो सक्रिय नावाच्या नैसर्गिक घटनेचा परिणाम आहे. या अभ्यासात संशोधकांनी भूतकाळात 19 79 ते 2019 वर्तमान 2001 ते 2023 मध्ये भारतातील सर्वोच्च तापमानासारख्या घटना कशाबद्दल याची विश्लेषण केले आहे. 🌞




   गेल्या मे महिन्यात सर्वाधिक उष्णतेची लाट🌞🌞🌞




या विश्लेषणात असे म्हटले आहे की, सध्याचे हवामानातील तत्सम घटनांमध्ये दर्शविलेली तापमान भूतकाळाच्या तुलनेने किमान एक पॉईंट पाच अंश सेल्सिअसने जास्त आहे. तसेच या विश्लेषणात पावसाच्या बदलामुळे कोणतेही लक्षणे बदल मात्र दिसून येत नाही.



यासंदर्भात रेंज नॅशनल सेंटर ऑफ सायंटिफिक रिसर्च चे डेव्हिड परांडा म्हणाले की क्लायमेटोमीटरची निष्कर्ष ही अधोरेखित करतात की, जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे भारतात उष्णतेच्या लाटा तापमानाच्य लाटा तापमानाच्या असावी मर्यादेपर्यंत पोहोचत आहेत.


ती म्हणाली तापमानात पन्नास अंशाच्या आसपास पोहोचण्यावर कोणताही तांत्रिक उपाय नाही. आपण सर्वांनी कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये तापमानाला मर्यादा ओढण्यापासून रोखण्यासाठी काम केले पाहिजे.


या संदर्भात बोलताना नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे जियान मार्को म्हणाले की, या अभ्यासाचे निष्कर्ष नसर्गिक परिवर्तनशिकता आणि हवामान बदल यांच्यातील जटिल परस्पर संबंध प्रतिबिंबित करतात. उष्ण कटिबंधीय आणि उपोषण कटिबंधीय प्रदेशांमध्ये हवामानातील बदल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.


ज्यामुळे  भविष्यात उष्णतेच्या आणखी तीव्र लाटा येऊ शकतात .व यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यासाठी आपण प्रत्येकाने व प्रत्येक व्यक्तीने येणाऱ्या पावसाळ्यात प्रतिव्यक्ती एक झाड लावणे महत्त्वाचे आहे.

 व त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या पाच वर्षात मिळू शकतो. सध्या पृथ्वीवर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे आपल्याला उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहे.

 आपण त्यासाठी काही प्रतिबंध वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे जर वृक्षतोड थांबल्या गेली नाहीत तर येणाऱ्या काळात आपल्याला फार मोठी नुकसान होण्याची शक्यता आहे.




प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावणे का गरजेचे आहे. 🌳🌳🌳



जर प्रत्येक व्यक्तीने एक झाड जर जरी लावली तरी काही करोड आबादी वाला आपला भारतीय आहे जितकी लोकसंख्या तिची वृक्ष जर असते. तर ऑक्सिजनची निर्मिती फार जास्त होईल त्याचा फायदा आपल्याला कालांतराने होईल व पुढच्या पिढीसाठी त्याचा खूपच फायदा होईल. येणाऱ्या पाच वर्षात आपल्याला त्याचा खूपच फायदा होईल व हवामानात सुद्धा स्थिर बदल होईल उष्णता कमी होईल व पृथ्वी समतोल वातावरणात राहतील.


आपल्या भारत देशात संतांनी म्हणून ठेवले आहे व महापुरुषांनी सुद्धा म्हणून ठेवले आहे. झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी जाती हीच सगळी सोयरी, त्यासाठी येणाऱ्या पावसाळ्यात आपण प्रत्येकाने झाड लावणे गरजेचे आहे.

 झाडापासून अनेक फळे मिळते ,सावली मिळते, ऑक्सिजनची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि पृथ्वीवरील उष्णतेचा धोका पुढील पिढीसाठी कायमचा नाहीसा होऊन जाईल.

 झाडे प्रत्येक माणसासाठी आवश्यक आहे जनावरांसाठी आवश्यक आहे. आपल्याला जगण्यासाठी व पशु पक्षांसाठी प्राण्यांसाठी शेतीसाठी पावसासाठी झाडे लावणे गरजेचे आहे प्रत्येक व्यक्तीने कोणता आणि कोणत्याही झाड लावणे फार महत्त्वाचे आहे.

  एक व्यक्ती  एक झाड 🌳🌳🌳🌳
 

चला तर मग आपण या पावसाळ्यात एक निश्चय करूया प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने एक झाड तरी लावावे. मी लावणार तुम्ही पण लावा या जगाच्या व पृथ्वीच्या फायद्यासाठी व आपल्या पुढील भविष्यासाठी एक झाड एक व्यक्ती लावणे गरजेचे आहे.

Friday, June 7, 2024

महाराष्ट्रात- मान्सूनची- वाटचाल- कुठपर्यंत? Monsoon News

 

https://saamtv.esakal.com/mumbai-pune/weather-forecast-7-june-2024-monsoon-has-entered-maharashtra-heavy-rainfall-alert-this-area-next-5-days-ssd9
Monsoon News 📢📢

निवडणुकीच्या दामाधुमी नंतर शेतकरी राजा शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. सध्या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहे.Monsoon News, जून नंतर राज्यात मोसमी पावसाची वारी वाहने सुरू झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या कट्टर तयार झाल्याने सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. यावर्षी आठ दिवस उशिराने मान्सूनचे आगमन होणार आहे. येत्या 13 जून नंतर मान्सूनचे आगमन  महाराष्ट्रात काही जिल्ह्यात होणार आहे शेतकऱ्यांनी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये ,असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. मागील वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी व राज्यात दुष्काळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती.

महाराष्ट्रात मान्सून कुठपर्यंत आलाय जाणून घेऊया ! ⛈⛈⛈

यामुळे राज्यात पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच काही प्रमाणात उगवलेली पिके अवकाळी पावसामुळे नष्ट झाली तसेच ,रब्बी हंगामा देखील अवकाळी पावसामुळे नुकसान झाली. गहू हरभऱ्याचे इतर पिकांची नुकसान झाले आहे .यामुळे मागील संपूर्ण हंगाम निसर्गाच्या वकृपेमुळे शेतकऱ्यांसाठी फारच कठीण गेला आहे.


राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू☔☔☔



Monsoon Newsराज्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे. अल निनो चा प्रभाव कमी झाल्याने असल्याने मान्सून सामान्य राहील. 13 जून नंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.


यावर्षी मान्सून समाधानकारक पडण्याचा अंदाज ⛈⛈⛈



Monsoon News,मागील वर्षी नागरिकांना कमी पावसामुळे दुष्काळाच्या झाला सोसाव्या लागल्या आहेत यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.


अल निनो चा प्रभाव कमी झाल्याने यंदा Monsoon News,पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात व राज्यात मागील, वर्षी हवामानावर अल निनो चा प्रभाव असल्याने उन्हाळ्यात , गारांच्या पावसाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता . यंदाच्या स्थितीत बदल झालेला आहे.


राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सध्या सक्रिय ⛈⛈



राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये सध्या`Monsoon News, मान्सून सक्रिय झालेला आहे. कोकण किनारपट्टी तसेच मुंबई ,पुणे ,रत्नागिरी ,रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा अनेक भागांमध्ये सध्या मान्सून दाखल होत आहे. राज्यात एकंदरीत पाहता सध्या स्थिती मान्सून साठी  योग्य आहे. पुढील आठवड्यात उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये `Monsoon ,आगमन होईल. मान्सूनचा पाऊस होण्यास उशीर असल्या तरी पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान तज्ञ कडून वर्तवण्यात आलेला आहे.


Monsoon News,दोन दिवसापूर्वी अंदमानात मान्सून दाखल झालेला आहे 4 जून रोजी जिल्ह्यातील विविध भागात व गावामध्ये मान्सून पावसाच्या सरी कोसळले आहे.

Sunday, June 2, 2024

दोन दिवसात उष्णतेचा जोर कमी होणार/मान्सूनचा मुक्काम केरळात/monsoon update

 

monsoon update☔☔☔

 

Maharashtra monsoon update⛈⛈⛈. 




monsoon update☔☔☔

ईशान्य भारतात मोसमी वाऱ्याना, ईशान्य भारतात रेमल वादळामुळे मोसंमि वारे वेगाने पुढे जात आहे.



महाराष्ट्र: ईशान्य भारतात सुरू झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम म्हणून, उत्तर भारताचे महाराष्ट्रातील उष्णतेची तीव्र लाट पुढील दोन दिवसात कमी होणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारी नैऋत्य बंगालचा उपसागर अरबी समुद्र आणि ईशान्य भारतात पुढे सरकले. मात्र केरळमध्ये ही वारे दोन दिवसापासून मुक्कामी बसले आहे.

 monsoon update



नैऋत्य मोसमी वारी ईशानी बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये आणि ,वायव्य बंगाल उपसागराच्या काही भागांमध्ये, त्रिपुरा निघाले, आणि आसामच्या उर्वरित भागांमध्ये आणि, उप हिमालय, पश्चिम बंगाल ,आणि सिक्कीमच्या बहुतांशी भागांमध्ये पुढे सरकली आहेत.


मोसमी वारी, मध्य अरबी समुद्राच्या आणखी भागात ,दक्षिण ,अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षदीप क्षेत्र आणि , कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडूचा ,आणखी वेगाने धडकले आहे. दोन-तीन दिवसात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. ईशानी भारतात आणि दक्षिणेकडील भागात अति मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून उष्णतेची लाट पुढील दोन दिवसात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 45 ते 48 यांच्यावर केलेली तापमानाचा पारा कमी होण्यास मदत होईल.                                  🌞🌞🌞🌞


असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी दिला. शनिवारी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे 48.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ईशान्य भारत रेमल  चक्रीवादळामुळे मोसमी वारे वेगाने पुढे जात आहे. मात्र अरबी समुद्राकडून, केरळ पर्यंत मार्गावर या वाऱ्यांना पुढे येणारी कोणतीच प्रणाली नसल्याने ते सध्या अडखळले आहे.


दरम्यान,Maharashtra monsoon update राज्यात रविवारपासून पावसाची शक्यता आहे. रविवार दोन जून विजाच्या कडकडे सह विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भाला 5 जून पर्यंत पिवळा इशारा देण्यात आला आहे.

4 जून रोजी पावसाची शक्यता!⛈⛈⛈⛈⛈⛈⛈



लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी चार जून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाड्यात तुरळ ठिकाणी मेघगर्जिनीसह विजाचा क** ह ट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

तसेच बऱ्याच काही भागात म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पावसाचे आगमन होणार आहे. व ठीक ठिकाणी विजेच्या करकटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी पावसामध्ये शेतामध्ये थांबूनही कारण या पावसात विजा पडण्याची दाट शक्यता आढळून येणार आहे. आपली जनावर गोठ्यात बांधून टाकावेत कारण या पावसात इजा खूप होणार असल्यामुळे हा पाऊस अवकाळी आहे. कोणीही झाडाखाली थांबून नका. वि ज हो ण्यास सुरुवात झाली किंवा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. की प्रत्येक शेतकऱ्याने शेतात कोणी थांबणार नाही याची काळजी घ्यावी व आपले जनावरे घराच्या दिशेने काढावी म्हणजे या पावसात जीवितहानी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.


अजून एक सांगायचं झालं म्हणजे. बरेच शेतकरी पाऊस सुरू झाल्यानंतर शेतात कामासाठी निघतात. तर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाऊस चालू झाल्यानंतर कोणीही घराबाहेर शक्यतो बाहेर जाणे टाळावे. कारण या पावसात नुकसानकारक पाऊस आहे हा पाऊस सर्व , दूर पडणार नाही कारण हा पाऊस भाग बदलत पडणार असल्यामुळे हा पाऊस अवकाळी आहे.

याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. आणि हवामानात जर अचानक बदल झाल्यास तुम्हाला पुढील बातमी देण्यात येईल.

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...