Saturday, May 18, 2024

आता शेतात पाईपलाईन करण्यासाठी मिळते, 30 हजार रुपये अनुदान-agriculture news2024

 PVC pipe subsidy 2024:-पाईपलाईन करण्यासाठी आवश्यक असलेल्या पीव्हीसी पाईप साठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदान मिळते.  PVC pipe subsidy 2024 चला तर मग जाणून घेऊया या संदर्भातील 
 सविस्तर माहिती.

PVC pipe subsidy 2024






सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेत खाली आहे अशावेळी शेतकरी बांधव पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतातील बारी बाकी राहिलेले कामे पूर्ण करून घेतात.


बऱ्याच शेतकऱ्यांनी जमीन वेगवेगळ्या गट नंबर मध्ये असते अशावेळी विहीर एका गटात असेल तर दुसऱ्या गटातील शेतामध्ये पाणी नेहमी शक्य होत नाही.


अशावेळी जेव्हा शेत मोकळी झाली असती म्हणजेच उन्हाळ्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये पाईपलाईन करण्याची काम करून घेतात.



पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी पाईप साठी किती मिळते अनुदान. Pvc pipe subsidy



PVC pipe subsidy, या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जास्तीत जास्त तीस हजार रुपये एवढी सबसिडी मिळते.


पीव्हीसी पाईप अनुदान pvc pipe subsidy 2024 मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा अर्ज (महाडीबीटी वेब पोर्टल) शेतकरी करू शकतात.


तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करत असाल आणि तुम्हाला पीव्हीसी पाईप वर अनुदान हवे असेल तर त्यासाठी तीस हजार रुपये अनुदान मिळते.



अर्ज कुठे करावा आणि किती मिळतात पाईप



अर्जदार जास्तीत जास्त 828 मीटर लांबीची पीव्हीसी पाईप खरेदी करू शकतात म्हणजे जवळपास 70 पाईप साठी शासनाकडून अनुदान मिळते.


जास्तीत जास्त तीस हजार रुपयांपर्यंत हे अनुदान दिले जाते यासाठी महाडीबीटी या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.


त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊन शकतात.


तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या.


                                              PVC pipe subsidy 2024



लाभार्थी पात्रता
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत ही अनुदान मिळते अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी पात्रता अशी आहे.

  • लाभार्थी अनुसूचित जमाती  प्रवर्गातील असावा.
  • लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे.
  • जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादित दीड लाखाच्या आत असावी.
  • जमीन कमीत कमी 20 गुंठे व जास्तीत जास्त सहा हेक्टर पेक्षा जास्त नसावी.

एकदा या योजनेचा लाभ घेतला की पुढील पाच वर्षे या योजनेचा लाभ मिळणार नाही.


अशा पद्धतीने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी अनुदान मिळते तुम्ही देखील पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या.


असा करा ऑनलाईन अर्ज

महाडीबीटी या शेतकरी वेब पोर्टलवर लॉगिन करा.

अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.

सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.

या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून द्या.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

मुख्य घटक या रकान्यामध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.

बाब या चौकटीमध्ये क्लिक करताच विविध पर्याय दिले त्यापैकी पाईप हा पर्याय निवडा.


उपघटक या चौकटीवर क्लिक करून पीव्हीसी पाईप हा पर्याय निवडा.

पाईपलाईन ची लांबी टाका. जास्तीत जास्त 428 एवढी लांबी स्वीकारली जाते.



अर्ज सादर करण्याची पद्धत
अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करावा लागतो. एक सूचना येईल ती सविस्तर वाचून घ्या पहा, या बटणावर क्लिक करा.

योजनेसाठी प्राधान्य क्रमांक निवडा.

योजनेच्या अटी व शर्ती मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

तुम्ही जर नवीन असाल तर एवढे पेमेंट करा पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे दिलेल्या पर्याय मधील एखादा पर्याय वापरून पेमेंट करून द्या.

अशा पद्धतीने तुम्ही pvc pipe subsidy 2024 पीव्हीसी पाईप साठी अर्ज करू शकता.


पीव्हीसी पाईप साठी किती अनुदान मिळते?

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत पीव्हीसी पाईप साठी 30 हजार रुपये एवढे अनुदान मिळते.


PVC pipe subsidy मिळवण्यासाठी अर्ज कोठे करावा?

`पीव्हीसी पाईप अनुदान, मिळण्यासाठी `महाडीबीटी या पोर्टलवर अनुदान अर्ज, सादर करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर लॉटरीमध्ये लाभार्थ्याची निवड केली जाते आणि नंतर लाभ दिला जातो.


टीप . पूर्वसंमतीशिवाय कोणताही माल खरेदी केल्या जाऊ नये.









धन्यवाद....






6 comments:

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...