Bharatgas E- KYC; केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेअंतर्गत घरगुती वापराचा गॅस घेणाऱ्या लाभार्थ्यांना 30 मे पर्यंत ही केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले असून, जे लाभार्थी केवायसी करणार नाही त्यांचे अनुदान बंद होणार आहे. या अनुषंगाने लाभार्थ्यांना संबंधित एजन्सीने पत्र दिले आहे.
त्यासाठी संबंधित ग्राहकांनी केवायसी साठी इकडे, तिकडे न फिरता ,स्वतः घरबसल्या केवायसी तुमच्या मोबाईलवर करू शकता.
त्यासाठी आपला मोबाईल नंबर ,गॅस कनेक्शन ला लिंक करणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकाचा मोबाईल नंबर लिंक नाही अशा ग्राहकांसाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला मोबाईल नंबर सर्वप्रथम लिंक करून घेणे.
Update contact number येथे क्लिक करा
मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी भारत गॅस विंडो ओपन होईल ,तिथे आपला कस्टमर LPG ID नंबर किंवा कार्ड नंबर प्रविष्ट करा.
व खाली दिलेला कॅप्चर त्या रकान्यात भरा, व कंटिन्यू बटनावर क्लिक करा.
त्यानंतर लगेच दुसरा विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपला नवीन मोबाईल नंबर इंटर करा. व ओटीपी साठी व्हेरिफिकेशन करून घ्या. नवीन मोबाईल नंबर लिंक होइल.
- त्यानंतर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो बीपीसीएल ॲप डाऊनलोड करा.
हॅलो बीपीसीएल ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- ॲप डाऊनलोड झाल्याच्या नंतर, आपला भारत गॅसला असलेला मोबाईल नंबर टाकून व्हेरिफाय करा.
- त्यानंतर आधार फेस आरडी ॲप डाऊनलोड करून घ्या. . क्लिक करा.
- त्यानंतर चेहरा या कॅप्चर दिसेल असा गोल हिरव्या कलरच्या वर्तुळात नीट भरून ठेवा. व आपली डोळ्याची पापणी हळूहळू हलवा लगेच चेहरा कॅप्चर होईल.
आणि आपला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून किंवा कार्ड नंबर टाकून ओटीपी पडताळणी करून घ्या, त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल. लगेच आपला चेहरा कॅमेरा समोर आपली डोळ्याची पापणी हळूहळू हलवणे लगेच मेसेज केवायसी सक्सेसफुल होईल.
No comments:
Post a Comment