Thursday, May 16, 2024

केवायसी केली, तरच मिळणार (Lpg)गॅस; अन्यथा कनेक्शन बंद, सबसिडी ही नाही

 गॅस एजन्सीच्या वतीने ग्राहकांना केवायसी करून घेण्याचे आवाहन📢📢📢📢📢




Bharatgas E KYC🔥🔥🔥🔥उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना बंधनकारक: अन्यता अनुदान बंद, उज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्याच्या घरी गॅस सिलेंडर येतो त्यांना पुन्हा चुलीकडे वळायची नसेल तर लवकरच लवकर केवायसी प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे अन्यथा योजनेचे अनुदान बंद होईल सर्वसामान्य ग्राहकाप्रमाणे 906 रुपयांना गॅस सिलेंडर घेण्याची वेळ येणार आहे .


गरीब व दारिद्र रेषेखालील कुटुंबातील महिलांची चुलीपासून सुटका व्हावी यासाठी 2016साली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातच उज्वला गॅस योजनेचे दोन लाखावर लाभार्थी होती. मात्र त्यावेळी डिपॉझिट द्यावी लागत होती सध्या सुरू असलेल्या योजनेअंतर्गत यातील सूट दिली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून उज्वला योजना 2.0 सुरू केली आहे.


सर्वसामान्य ग्राहकांसाठी गरजेचे

सर्वसामान्य ग्राहकांना देखील भविष्यात अनुदानाचा लाभ मिळावाचा असेल तर ई केवायसी गरजेचे आहे डिलिव्हरी बॉय फिटिंग प्रिंट मशीन आणि प्रत्यक्ष गॅस एजन्सी कडे जाऊन अशी तिन्ही प्रकारेही ठेवायची करता येते त्यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुक गरजेचे आहे.


जिल्ह्यात उज्वला गॅसचे दोन लाखावर लाभार्थी

उज्वला गॅस योजना सुरू झाली त्यावेळी पासून पहिला टप्पा संपेपर्यंत जिल्हा दोन लाख लाभार्थी होती. आता गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 16 हजार कुटुंबांमध्ये उज्वला योजना पोचली आहे अशा रीतीने जिल्ह्यात दोन लाख सोळा हजार लाभार्थी आहे.



केवायसी ची मुदत कधीपर्यंत?

इ केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत होती पण अजूनही प्रक्रिया थांबविण्यात आलेली नाही त्यामुळे ती किती दिवस किंवा किती महिने सुरू राहील याची माहिती नाही त्यामुळे अधिकारी 30 मे पर्यंत ही केवायसी पूर्ण करून घेण्याची आवाहन करत आहे.



उज्वला, चे अनुदान किती?

  • उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये अनुदान म्हणून दिले जाते.
  • सर्वसामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडर 906 रुपयांना मिळतो.
  • उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तो 606 रुपयांना मिळतो.


सर्वच लाभार्थ्यांनाही केवायसी बंधनकारक

दुसऱ्या टप्प्या अंतर्गत उज्वला योजनेचा लाभ देतानाच ई केवायसी केली जाते मात्र पहिल्या टप्प्यातील अनेक लाभार्थ्यांना केवायसी केलेली नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने उज्वला च्या सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक केली आहे.






धन्यवाद..


7 comments:

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...