Friday, May 24, 2024

आता फळबाग लागवड योजनेसाठी- मिळणार 100 % अनुदान . falbag planting Yojana2024

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024: शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात, त्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 शंभर टक्के अनुदानात मिळणार आहे.

                            

                                     📢📢📢📢
महाराष्ट्र शासन योजना २०२४👈👈



 falbag planting Yojana2024


यामध्ये प्रति एकर एक लाख 40 हजार रुपये अनुदान दिले जाते. त्या अनुदान शेतकऱ्यांना अशाप्रकारे वाट दिली जाते, तसेच की टप्प्यामध्ये दिली जाते, या योजनेसाठी कोणतीही शेतकरी पात्र आहे याची सविस्तर माहिती या लेखनामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे वाचकांनी हा लेख शेवटपर्यंत वाचावा.


या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आंबा, डाळिंब, द्राक्ष, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ कोकम, फणस, कागदी लिंबू, संत्रा, शिकू ,अंजीर, मोसंबी, या फळबाग प्रति शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.



   भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी पात्रता.

  • अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याला फळबाग केल्यानंतर त्या फळबागेला ठिंबक सिंचन बसावे लागेल यासाठी सरकारकडून शंभर टक्के अनुदान देण्यात येते त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला तुमची शेतामध्ये ठिंबक सिंचन बसावे लागेल.
  • त्यानंतर अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल की जे शेतकरी संपूर्णपणे शेती करतात त्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये काम करत नसेल त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा असेल शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो.
  • त्याचबरोबर जर शेतकरी मी याच्या अगोदर संबंधित योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ आता मिळू शकत नाही.

  भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अनुदान वाटप




महत्त्वाचे म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग  योजना 2024, योजनेसाठी अनुदान ही तीन टप्प्यांमध्ये दिले जाते, ज्यामध्ये प्रथम टप्प्यात जेव्हा अर्जदार उमेदवार या योजनेसाठी पात्र होतो तेव्हा त्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते. म्हणजे जर तुम्हाला योजनेसाठी एक लाख रुपये मंजूर झाले असतील तर प्रथम वर्ष तुम्हाला 50 टक्के अनुदान मिळणार आहे. म्हणजेच 50 हजार रुपये इतकी अनुदान मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 30 टक्के अनुदान दिले जाते, म्हणजे तीस हजार रुपये तुम्हाला दिले जातात त्यानंतर शेवटच्या टप्प्यात तुम्हाला 20 टक्के अनुदान दिले जाते जे असेल 20000 रुपये इतकी, अशाप्रकारे टप्प्यामध्ये तुम्हाला तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या योजनेचा लाभ दिला जातो भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024


  भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना साठी आवश्यक कागदपत्रे
   
  1. ओळखीसाठी आधार कार्ड
  2. सातबारा उतारा 8 अ खाते उतारा
  3. जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  4. तहसीलदार उत्पन्न दाखला
  5. बँक खात्याची छायांकित प्रत
  6. मोबाईल क्रमांक
  7. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अर्ज करू शक

 ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

1. मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या माही सेवा केंद्र मध्ये जाऊन संबंधित योजनेची माहिती घेऊन तिथून तुम्ही अर्ज करू शकता.


2. किंवा तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम, महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाईटवर भरती भेट द्यायची आहे. तेथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर सदरच्या संकेतस्थळावर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करू शकता.

3 अर्ज भरत असताना काही अडचणी येत असतील तर जवळच्या माई सेवक केंद्रातून अर्ज भरा.

4.सदरील योजनेची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈


         सारांश-
                        


अशाप्रकारे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे सांगितली आहे तुम्ही काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आम्ही तुमची समस्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू.


1 comment:

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...