Friday, May 31, 2024

मान्सून- केरळमध्ये दाखल/लवकरच- महाराष्ट्रात धडकणार ! Monsoon in Kerala

 Monsoon Maharashtra: शेतकरी व नागरिकांसाठी आनंद वार्ता, असून ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, तो मान्सून अखेर केरळ व ईशान्य भारतात गुरुवारी दिनांक 30 रोजी, अंदाजानुसार एक दिवस आधीच दाखल झाला.

Weather Forecast☔☔☔


                             मान्सूनचे वेळेपूर्वीच केरळमध्ये आगमन झाले आहे.⛈⛈⛈ 



Monsoon,वाटचाल वेगाने होत असून, लवकरच महाराष्ट्रातही दाखल होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.


गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाची सावट आहे. म्हणून पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. काही दिवसापासून देशात तापमानाचा पारा चांगलाच कडाडला आहे. विदर्भ मराठवाड्यात उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच पुढील आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होत असल्याने शेतकऱ्यांचे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


यावर्षी चांगला मान्सून,Monsoon बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शेतकरी व नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी असून शेतकरी हा शेतीच्या पूर्व मशागतीला लागला आहे. शेतीची पूर्ण कामे आटपून तो सध्या ,Monsoon मान्सूनच्या परिस्थितीत आहे. हवामान विभागाने वर्तवल्या अंदाजानुसार लवकरच मान्सून महाराष्ट्र दाखल होईल.


यावर्षी मान्सून चांगल्या प्रकारे बरसणार⛈⛈⛈


दरवर्षी, Monsoon,मानसून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होत. यंदा मात्र दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. यावर्षी अंदमान निकोबार मध्ये मान्सून वेळेपूर्वीच म्हणजे 19 मे रोजी दाखल झाला. त्यानंतर माणसांची वाटचाल चांगली राहिली आहे. यंदा देशभरात सरासरीच्या 106% पाऊस पडला असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.



Thursday, May 30, 2024

यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता! good rain this year2024

 यावर्षी दिलासादायक पाऊस, जून मध्ये पेरणी योग्य पावसाचा अंदाज.(good rain year2024)


 यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता!

Maharashtra; राज्यात पंधरा दिवसात आलेल्या उष्णतेच्या लाठीने नागरिक हैराण झाले होते. उष्णतेची ही लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पश्चिमी चक्र वार्तामुळे 35 ते 40 किमी प्रति तास या वेगाने वारे वाहत असून याचा प्रभाव दोन दिवस राहणार आहे.


एकीकडे तापमानात घट येत असताना जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरल्यास राज्याची दुष्काळाच्या फेऱ्यातून सुटका होणार आहे.


महाराष्ट्र राज्य कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी हवामान केंद्र आणि मंगळवारी केंद्रीय हवामान खात्याचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


यामुळे पंधरा जून ते पंधरा जुलिया खरीप पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना सोनियोजित पद्धतीने पेरण्या करता येणार आहेत.

  good rain this year2024

भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकताच मान्सूनचा जून ते सप्टेंबर अंदाज जाहीर केला. त्यानुसार यावर्षी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त 106% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाचा योग्य अंदाज घेत शेतकऱ्यांनी पिकाची योग्य नियोजन केले तर चांगले उत्पादन येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


पाच दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहून आणि , 75 ते 100 मीमी पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील पुरेसा पुलावा लक्षात घेऊन पेरणी करावी असे जिल्हा व राज्य कृषी  हवामान केंद्र यांनी कळवले आहे.


शेतकरी वर्गाने पिकाची सुधारित जातीची प्राधान्य देऊन योग्य फिक्स व्यवस्थापन करावे.



पेरणी उताराला आडवी करावी पेरणी करताना वरंबा व सरी पद्धतीने पेरणी करावी.
शेतकऱ्यांनी वीज पडू नये टाळण्यासाठी आणि स्वतः जनावराच्या रक्षणासाठी, दामिनी या मोबाईल ॲप्स वापर करावा अशी माहिती जिल्हा कृषी हवामान व राज्य कृषी हवामान केंद्राने दिली आहे.


जिल्ह्यातील विविध भागात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोसमी पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणी योग्य 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी गेल्या वर्षातून एकदा पावसाचा अंदाज चांगला दर्शविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी  आणि कृषी आणि हवामान तंत्रज्ञानाच्या साधना  वापर कराव्यात. पाऊस चांगला होणार असल्याने भूजल ही पातळी वाढण्याची संकेत आहेत.

ला निनो, मुळे यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.


1) जिल्ह्यातील व राज्यातील  सप्टेंबर महिन्यात सरासरी 860 मीटर एवढा पाऊस पडतो गेल्या वर्षी पण अल निनो चा प्रभाव असल्याने जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाने हजेरी दिली होती .सरासरीपेक्षा जवळपास २१ टक्के अर्थात 683 मिनी पाऊस पडला होता. परंतु यंदाच्या वर्षी अल नीनो, चा कमी झाल्याने आणि लाल नीनूच्या प्रभावामुळे चांगल्या पावसाची संकेत मानसून हवामानाच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हवामान आधारित शेतीला काय लाभ होणार? good rain this year2024

2) जिल्ह्यात यंदा दोन लाख 97 हजार हेक्टर खरीप पिके पेरा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे एक लाख 31 हजार आहे .पावसाळ्याचा अंदाज या दोन तालुके संपूर्णपणे दुष्काळीत होते इतर चार तालुक्यातील काही मंडळात दुष्काळ जाहीर आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यात राज्यात काही तालुके  कोरडे संपूर्ण होते.गेल्या हंगामात पाऊस फारच कमी झाला आहे.


Monday, May 27, 2024

Remal(cyclone)चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर, परिणाम काय होणार? 2024

  वाच सविस्तर माहिती!


 Remal cyclone; तीव्र चक्रीवादळ रेमल, रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर भागावर अंदाजी 110 की 120 किमी प्रति तास वेगाने धडकले. चक्रीवादळामुळे किनारपट्टी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच राजधानी कोलकत्ता आणि त्याच्या लगतच्याही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.🌀🌀🌀🌀

⛅⛅⛅⛅⛅⛅





भारतीय हवामान विभागाची माजी क्षेत्रिय प्रमुख स्वामीनाथ दत्ता यांनी सांगितले की, 2020 स*** आलेल्या चक्रीवादळ Iamfine, रेमल मुळे कमी नुकसान होईल,



एक लाखाहून अधिक लोक स्थलांतरित


खबरदारीचा उपाय म्हणून बंगाल सरकारने ,सुंदरबन आणि सागर बेटा सर किनारपट्टी भागातील सुमारे एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित हसरे स्थानी हलवले आहे.



चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम काय होणार?🌀🌀🌀


Maharashtra; राज्यात उष्णतेच्या लाठी मुळे तापमानाचा पारा 45 पार झाल्याने, जळगाव आणि अकोला जिल्ह्यातील 31 मे पर्यंत कलम 144 लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्याकडून काढण्यात आला आहेत. उन्हासाठी अशा प्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.🌞🌞🌞


Maharashtra rain news; मुंबई आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई शहर आणि उपनगराला हलक्या पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तास पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काल अचानक आलेल्या वादळामुळे विदर्भातील चार जिल्ह्यात मोठा नुकसान झाला आहे. अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा फटका बसला काल अचानक वादळी वारी आले व मोठा पाऊस बरसात यामुळे उन्हाळी पिकाची देखील मोठे नुकसान झाले आहे.



Remal(cyclone)घराची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उकळून जमीन दिवस पडली आहेत शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. विजेचे काम पडल्यामुळे वीज देखील व वीज पुरवठा देखील काही तास खंडित होता तर शेगाव ते वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.



राज्यात वाढत्या उघड्यामुळे मान्सून राज्यात लवकर येण्याची संकेत मिळत आहेत. 10 जूनला मान्सून मुंबई सह कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. 31 मे ला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. 15 जूनला मान्सून मराठवाडा विदर्भ येण्याची शक्यता आहे.



☔☔☔पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आपत्कालीन व्यवस्था पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. एक जून पासून हा कक्ष सुरू होणार आहे. दुर्घटना घडल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करता यावी यासाठी हा कक्ष सुरू करण्यात येतो.


महाराष्ट्रावर एवढा काही खास या वादळाचा परिणाम होणार नाही.

Friday, May 24, 2024

आता फळबाग लागवड योजनेसाठी- मिळणार 100 % अनुदान . falbag planting Yojana2024

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024: शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात, त्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 शंभर टक्के अनुदानात मिळणार आहे.

                            

                                     📢📢📢📢
महाराष्ट्र शासन योजना २०२४👈👈



 falbag planting Yojana2024


यामध्ये प्रति एकर एक लाख 40 हजार रुपये अनुदान दिले जाते. त्या अनुदान शेतकऱ्यांना अशाप्रकारे वाट दिली जाते, तसेच की टप्प्यामध्ये दिली जाते, या योजनेसाठी कोणतीही शेतकरी पात्र आहे याची सविस्तर माहिती या लेखनामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे वाचकांनी हा लेख शेवटपर्यंत वाचावा.


या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आंबा, डाळिंब, द्राक्ष, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ कोकम, फणस, कागदी लिंबू, संत्रा, शिकू ,अंजीर, मोसंबी, या फळबाग प्रति शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.



   भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी पात्रता.

  • अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याला फळबाग केल्यानंतर त्या फळबागेला ठिंबक सिंचन बसावे लागेल यासाठी सरकारकडून शंभर टक्के अनुदान देण्यात येते त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला तुमची शेतामध्ये ठिंबक सिंचन बसावे लागेल.
  • त्यानंतर अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल की जे शेतकरी संपूर्णपणे शेती करतात त्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये काम करत नसेल त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा असेल शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो.
  • त्याचबरोबर जर शेतकरी मी याच्या अगोदर संबंधित योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ आता मिळू शकत नाही.

  भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अनुदान वाटप




महत्त्वाचे म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग  योजना 2024, योजनेसाठी अनुदान ही तीन टप्प्यांमध्ये दिले जाते, ज्यामध्ये प्रथम टप्प्यात जेव्हा अर्जदार उमेदवार या योजनेसाठी पात्र होतो तेव्हा त्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते. म्हणजे जर तुम्हाला योजनेसाठी एक लाख रुपये मंजूर झाले असतील तर प्रथम वर्ष तुम्हाला 50 टक्के अनुदान मिळणार आहे. म्हणजेच 50 हजार रुपये इतकी अनुदान मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 30 टक्के अनुदान दिले जाते, म्हणजे तीस हजार रुपये तुम्हाला दिले जातात त्यानंतर शेवटच्या टप्प्यात तुम्हाला 20 टक्के अनुदान दिले जाते जे असेल 20000 रुपये इतकी, अशाप्रकारे टप्प्यामध्ये तुम्हाला तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या योजनेचा लाभ दिला जातो भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2024


  भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना साठी आवश्यक कागदपत्रे
   
  1. ओळखीसाठी आधार कार्ड
  2. सातबारा उतारा 8 अ खाते उतारा
  3. जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  4. तहसीलदार उत्पन्न दाखला
  5. बँक खात्याची छायांकित प्रत
  6. मोबाईल क्रमांक
  7. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अर्ज करू शक

 ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

1. मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या माही सेवा केंद्र मध्ये जाऊन संबंधित योजनेची माहिती घेऊन तिथून तुम्ही अर्ज करू शकता.


2. किंवा तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम, महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाईटवर भरती भेट द्यायची आहे. तेथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर सदरच्या संकेतस्थळावर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करू शकता.

3 अर्ज भरत असताना काही अडचणी येत असतील तर जवळच्या माई सेवक केंद्रातून अर्ज भरा.

4.सदरील योजनेची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈


         सारांश-
                        


अशाप्रकारे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे सांगितली आहे तुम्ही काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आम्ही तुमची समस्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू.


Bharatgas E- KYC -तुम्ही सुद्धा करू शकता,तुमच्या मोबाईल वरुण.






 Bharatgas E- KYC; केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेअंतर्गत घरगुती वापराचा गॅस घेणाऱ्या लाभार्थ्यांना 30 मे पर्यंत ही केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले असून, जे लाभार्थी केवायसी करणार नाही त्यांचे अनुदान बंद होणार आहे. या अनुषंगाने  लाभार्थ्यांना संबंधित एजन्सीने पत्र दिले आहे.




त्यासाठी संबंधित ग्राहकांनी केवायसी साठी इकडे, तिकडे न फिरता ,स्वतः घरबसल्या केवायसी तुमच्या मोबाईलवर करू शकता.


त्यासाठी आपला मोबाईल नंबर ,गॅस कनेक्शन ला लिंक करणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकाचा मोबाईल नंबर लिंक नाही अशा ग्राहकांसाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला मोबाईल नंबर सर्वप्रथम लिंक करून घेणे.


Update contact number येथे क्लिक करा

मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी भारत गॅस विंडो ओपन होईल ,तिथे आपला कस्टमर LPG ID नंबर किंवा कार्ड नंबर प्रविष्ट करा.





व खाली दिलेला कॅप्चर त्या रकान्यात भरा, व कंटिन्यू बटनावर क्लिक करा.


त्यानंतर लगेच दुसरा विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपला नवीन मोबाईल नंबर इंटर करा. व ओटीपी साठी व्हेरिफिकेशन करून घ्या. नवीन मोबाईल नंबर लिंक होइल.


  • त्यानंतर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो बीपीसीएल ॲप डाऊनलोड करा.


हॅलो बीपीसीएल ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.





  • ॲप डाऊनलोड झाल्याच्या नंतर, आपला भारत गॅसला असलेला मोबाईल नंबर टाकून व्हेरिफाय करा.






  • त्यानंतर आधार फेस आरडी ॲप डाऊनलोड करून घ्या.  . क्लिक करा.


  • त्यानंतर चेहरा या कॅप्चर दिसेल असा गोल हिरव्या कलरच्या वर्तुळात नीट भरून ठेवा. व आपली डोळ्याची पापणी हळूहळू हलवा लगेच चेहरा कॅप्चर होईल.






आणि आपला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून किंवा कार्ड नंबर टाकून ओटीपी पडताळणी करून घ्या, त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल. लगेच आपला चेहरा कॅमेरा समोर आपली डोळ्याची पापणी हळूहळू हलवणे लगेच मेसेज केवायसी सक्सेसफुल होईल.

Monday, May 20, 2024

12वी चा निकाल या दिवशी लागणार -HSC result 2024 maharashtra board

 HSC result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मुंबई, कोल्हापूर, अमरावती ,नाशिक, लातूर, व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक 21/ 5/ 2014 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहेत. अधिकृत संकेतस्थळ पुढील प्रमाणे आहे.


             📢📢📢📢📢📢📢📢





              HSC result 2024 maharashtra board







बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्तळ खालील प्रमाणे

  1. Maharesult.nic.in
  2. https://HSC result.mkcl.org
  3. www.mahahsscbord.in
  4. Https://results.digilocker.gov.in
  5. Www. Tv9marathi.com
  6. http;//results.targctpublications.org

 परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची विषयानिहाय संपादित केलेली गुण उपयुक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहिती घेता येईल.


www. Mahassc board.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.



तसेच www.maharesult.nicया संकेत स्थळावर विद्यार्थ्यांच्या निकाल ला सोबत निकालाची इरत सांख्यिक माहिती उपलब्ध होईल.

Sunday, May 19, 2024

मान्सून 31 मे रोजी केरळात धडकणार weather forecast today 2024

 Weather forecast today. उन्हाच्या तडक्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर जातकाप्रमाणे ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो मान्सून रविवारी दिनांक 19 अंदमान दाखल होत आहे. त्यानंतर 31 मे रोजी त्यांचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली दिलासादायक बाब म्हणजे यंदा बरसणार असून सुमारे १०६ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

weather forecast today 2024⚡⚡⚡



यंदा मान्सून धो- धो बरसणार;106 टक्के पाऊस पडण्याची संकेत⛅⛅





दरवर्षी मानसून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होत पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे 28 जून दरम्यान मान्सून भारताच्या मुख्य भूमी दाखल होण्याची शक्यता आहे.


मान्सून हा खेळ मध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटावर शिरगाव करतोय. दरवर्षी 21 मे रोजी या बेटावर मान्सून येत असतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मात्र 19 मे रोजी अंदमान निकोबार बेटा तू धडकणार आहे गेल्या वर्षी अंदमान आला तो 19 मे रोजी आला होता मात्र केरळमध्ये नऊ दिवस उशिराने म्हणजे आठ जूनला पोहोचला यांना त्यात काही बदल होतो का त्यावर माणसांचा देशातील पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे.


सध्या माणसांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे रविवारी मान्सून अंदमान मध्ये दाखल होईल तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टा तयार होत आहे त्यामुळे माणसं पुढे सरकण्यासाठी योग्य वातावरण राहील.



महाराष्ट्रात कधी येणार?☔☔


  • केरळमध्ये मान्सून आल्याची चर्चा होत असताना तो महाराष्ट्रात कधी येणार? याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे गेल्या वर्षी मान्सूनला महाराष्ट्रात येण्यास येण्यास बराच उशीर झाला होता.
  • त्यामुळे यंदा तसेच होणार की वेळेवर येणार? हे पाहणे उत्सुक असणार आहे दरम्यान महाराष्ट्रात मानसून 11 जून रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.


राज्यात काहीली वाढणार, अवकाळी ही बरसणार🌞🌞🌞


संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर म्हणजे 26जाने ओळख ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान त्यांनी माणिकराव फुले यांनी दिली 23 मे पासून दक्षिण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाळी पावसाळी तर 27मे पासून वळू स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.



दिल्ली सह उत्तरेत उष्णतेचा 'रेड अलर्ट'🌞🌞


राजधानी दिल्ली सह देशातील 11 राज्यात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाठीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातही दिल्ली, पंजाब, हरियाणा ,राजस्थान, व उत्तर प्रदेश ,मध्ये त्याचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. शुक्रवारी पश्चिम दिल्लीच्या नजरगड मध्ये यंदाच्या हंगामातील देशातील उंचीकी 47.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिनांक 30 एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या कलाईन कुडमध्ये 47 पॉईंट दोन अंश कमाल तापमान देण्यात आले होते.

54.30 कोटी लोकांना उष्णतेचा फटका
18 ते 21 मे दरम्यानच्या कालावधीत भारतातील 54.30 कोटी लोकांनी किमान एक दिवस तरी उष्णतेच्या लाटेचा सामना केला, अशी माहिती अमेरिकन हवामान अभ्यासक संस्था क्लाइमेट सेंटर नी दिला.


कुठे कोणता अलर्ट?
रेड अलर्ट. दिल्ली पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान
ऑरेंज अलर्ट. पूर्व राजस्थान ,उत्तर प्रदेश, बिहार


ला निना मुळे काय होणार?
  1. गेल्या वर्षी अल निनो सक्रिय होता तर यंदा तो संपुष्टात येत आहेत.
  2. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यात ला निना स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
  3. गतवर्षी अल निनो दरम्यान सामान्य पेक्षा कमी पाऊस झाला यंदा मात्र ला निना, मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त  करण्यात येत आहे.
  4. ला नीना असेल तर चागला पाउस होतो, असे आतापर्यंत चा इतिहास आहे.




💧



Saturday, May 18, 2024

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार, मुंबई -गुजरात मध्ये मुसळधार पावसाची शक्यता! Maharashtra rain news

 Maharashtra rain news:-23 ते 27 मे दरम्यान उडीसा, महाराष्ट्र गुजरात मध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. या चक्रीवादळामुळे 28 मे रोजी गुजरात आणि मुंबई मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.



Maharashtra rain news🌀🌀🌀


भारताला चक्रीवादळाचा (Cyclone) धोका निर्माण झाला आहे. बंगालचे उपसागरामध्ये bay of Bengal कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्यांनी रूपांतरित चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. 23 ते 27 मे दरम्यान उडीसा महाराष्ट्र गुजरात मध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. या चक्रीवादळामुळे 28 मे रोजी गुजरात मुंबई मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 Maharashtra rain news



राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तुफान अवकाळी पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्याचे पडत असलेल्या या पावसामुळे अनेक भागांमध्ये शेती पिकांची आणि घरांची मोठे नुकसान झाले आहे. कशामध्ये आता राज्यात आज देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .

 Maharashtra rain news⛅⛅⛅ 

आज सोलापूर ,कोल्हापूर, जालना, सिंधुदुर्ग, बुलढाणा, धाराशिव ,लातूर, हिंगोली ,अकोला, अमरावती, वाशिम, अहमदनगर ,सांगली, बीड, नांदेड ,परभणी, या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जरी करण्यात आला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आणि शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करत असताना काळजी घ्यावी अशी आवाहन हवामान खात्याने दिले आहे.


🌀🌀🌀🌀🌀

आता शेतात पाईपलाईन करण्यासाठी मिळते, 30 हजार रुपये अनुदान-agriculture news2024

 PVC pipe subsidy 2024:-पाईपलाईन करण्यासाठी आवश्यक असलेल्या पीव्हीसी पाईप साठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुदान मिळते.  PVC pipe subsidy 2024 चला तर मग जाणून घेऊया या संदर्भातील 
 सविस्तर माहिती.

PVC pipe subsidy 2024






सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेत खाली आहे अशावेळी शेतकरी बांधव पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतातील बारी बाकी राहिलेले कामे पूर्ण करून घेतात.


बऱ्याच शेतकऱ्यांनी जमीन वेगवेगळ्या गट नंबर मध्ये असते अशावेळी विहीर एका गटात असेल तर दुसऱ्या गटातील शेतामध्ये पाणी नेहमी शक्य होत नाही.


अशावेळी जेव्हा शेत मोकळी झाली असती म्हणजेच उन्हाळ्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये पाईपलाईन करण्याची काम करून घेतात.



पाईपलाईन करण्यासाठी पीव्हीसी पाईप साठी किती मिळते अनुदान. Pvc pipe subsidy



PVC pipe subsidy, या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जास्तीत जास्त तीस हजार रुपये एवढी सबसिडी मिळते.


पीव्हीसी पाईप अनुदान pvc pipe subsidy 2024 मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा अर्ज (महाडीबीटी वेब पोर्टल) शेतकरी करू शकतात.


तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करत असाल आणि तुम्हाला पीव्हीसी पाईप वर अनुदान हवे असेल तर त्यासाठी तीस हजार रुपये अनुदान मिळते.



अर्ज कुठे करावा आणि किती मिळतात पाईप



अर्जदार जास्तीत जास्त 828 मीटर लांबीची पीव्हीसी पाईप खरेदी करू शकतात म्हणजे जवळपास 70 पाईप साठी शासनाकडून अनुदान मिळते.


जास्तीत जास्त तीस हजार रुपयांपर्यंत हे अनुदान दिले जाते यासाठी महाडीबीटी या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.


त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊन शकतात.


तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या.


                                              PVC pipe subsidy 2024



लाभार्थी पात्रता
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत ही अनुदान मिळते अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी पात्रता अशी आहे.

  • लाभार्थी अनुसूचित जमाती  प्रवर्गातील असावा.
  • लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे.
  • जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादित दीड लाखाच्या आत असावी.
  • जमीन कमीत कमी 20 गुंठे व जास्तीत जास्त सहा हेक्टर पेक्षा जास्त नसावी.

एकदा या योजनेचा लाभ घेतला की पुढील पाच वर्षे या योजनेचा लाभ मिळणार नाही.


अशा पद्धतीने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी अनुदान मिळते तुम्ही देखील पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या.


असा करा ऑनलाईन अर्ज

महाडीबीटी या शेतकरी वेब पोर्टलवर लॉगिन करा.

अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.

सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.

या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून द्या.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

मुख्य घटक या रकान्यामध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.

बाब या चौकटीमध्ये क्लिक करताच विविध पर्याय दिले त्यापैकी पाईप हा पर्याय निवडा.


उपघटक या चौकटीवर क्लिक करून पीव्हीसी पाईप हा पर्याय निवडा.

पाईपलाईन ची लांबी टाका. जास्तीत जास्त 428 एवढी लांबी स्वीकारली जाते.



अर्ज सादर करण्याची पद्धत
अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करावा लागतो. एक सूचना येईल ती सविस्तर वाचून घ्या पहा, या बटणावर क्लिक करा.

योजनेसाठी प्राधान्य क्रमांक निवडा.

योजनेच्या अटी व शर्ती मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

तुम्ही जर नवीन असाल तर एवढे पेमेंट करा पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे दिलेल्या पर्याय मधील एखादा पर्याय वापरून पेमेंट करून द्या.

अशा पद्धतीने तुम्ही pvc pipe subsidy 2024 पीव्हीसी पाईप साठी अर्ज करू शकता.


पीव्हीसी पाईप साठी किती अनुदान मिळते?

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत पीव्हीसी पाईप साठी 30 हजार रुपये एवढे अनुदान मिळते.


PVC pipe subsidy मिळवण्यासाठी अर्ज कोठे करावा?

`पीव्हीसी पाईप अनुदान, मिळण्यासाठी `महाडीबीटी या पोर्टलवर अनुदान अर्ज, सादर करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर लॉटरीमध्ये लाभार्थ्याची निवड केली जाते आणि नंतर लाभ दिला जातो.


टीप . पूर्वसंमतीशिवाय कोणताही माल खरेदी केल्या जाऊ नये.









धन्यवाद....






Thursday, May 16, 2024

केवायसी केली, तरच मिळणार (Lpg)गॅस; अन्यथा कनेक्शन बंद, सबसिडी ही नाही

 गॅस एजन्सीच्या वतीने ग्राहकांना केवायसी करून घेण्याचे आवाहन📢📢📢📢📢




Bharatgas E KYC🔥🔥🔥🔥उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना बंधनकारक: अन्यता अनुदान बंद, उज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्याच्या घरी गॅस सिलेंडर येतो त्यांना पुन्हा चुलीकडे वळायची नसेल तर लवकरच लवकर केवायसी प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे अन्यथा योजनेचे अनुदान बंद होईल सर्वसामान्य ग्राहकाप्रमाणे 906 रुपयांना गॅस सिलेंडर घेण्याची वेळ येणार आहे .


गरीब व दारिद्र रेषेखालील कुटुंबातील महिलांची चुलीपासून सुटका व्हावी यासाठी 2016साली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातच उज्वला गॅस योजनेचे दोन लाखावर लाभार्थी होती. मात्र त्यावेळी डिपॉझिट द्यावी लागत होती सध्या सुरू असलेल्या योजनेअंतर्गत यातील सूट दिली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून उज्वला योजना 2.0 सुरू केली आहे.


सर्वसामान्य ग्राहकांसाठी गरजेचे

सर्वसामान्य ग्राहकांना देखील भविष्यात अनुदानाचा लाभ मिळावाचा असेल तर ई केवायसी गरजेचे आहे डिलिव्हरी बॉय फिटिंग प्रिंट मशीन आणि प्रत्यक्ष गॅस एजन्सी कडे जाऊन अशी तिन्ही प्रकारेही ठेवायची करता येते त्यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुक गरजेचे आहे.


जिल्ह्यात उज्वला गॅसचे दोन लाखावर लाभार्थी

उज्वला गॅस योजना सुरू झाली त्यावेळी पासून पहिला टप्पा संपेपर्यंत जिल्हा दोन लाख लाभार्थी होती. आता गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 16 हजार कुटुंबांमध्ये उज्वला योजना पोचली आहे अशा रीतीने जिल्ह्यात दोन लाख सोळा हजार लाभार्थी आहे.



केवायसी ची मुदत कधीपर्यंत?

इ केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत होती पण अजूनही प्रक्रिया थांबविण्यात आलेली नाही त्यामुळे ती किती दिवस किंवा किती महिने सुरू राहील याची माहिती नाही त्यामुळे अधिकारी 30 मे पर्यंत ही केवायसी पूर्ण करून घेण्याची आवाहन करत आहे.



उज्वला, चे अनुदान किती?

  • उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये अनुदान म्हणून दिले जाते.
  • सर्वसामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडर 906 रुपयांना मिळतो.
  • उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तो 606 रुपयांना मिळतो.


सर्वच लाभार्थ्यांनाही केवायसी बंधनकारक

दुसऱ्या टप्प्या अंतर्गत उज्वला योजनेचा लाभ देतानाच ई केवायसी केली जाते मात्र पहिल्या टप्प्यातील अनेक लाभार्थ्यांना केवायसी केलेली नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने उज्वला च्या सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक केली आहे.






धन्यवाद..


यावर्षी मान्सूनचे आगमन लवकरच होणार.Monsoon update good news2024

Monsoon update good news:-नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

2024






मुंबई: मान्सूनची (monsoon) आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मान्सूनच्या आगमनाची (monsoon arrival update) तारीख समोर आली आहे. कोणाच्या कडाक्या हैराण झाल्यास झाल्यासाठी ही दिलासा बातमी आहे. निवृत्ती मान्सून यंदा काही दिवस लवकर खेळलात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या बातमीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळत आहे. (नैऋत्य मान्सून केरळात 31 मे) रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


नैऋत्य मान्सून, आगमनाची तारीख ठरली


मागील वर्षी चार जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात मान्सून आठ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता नंदा 19 मे रोजी दक्षिण अंदमानाच्या संदर्भात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्वसामान्यपणे मान्सून एक जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.



ला. निनोमुळे चांगल्या पावसाची शक्‍यता यंदा वर्तवण्यात येत आहे.


यंदा मान्सून सामान्य तसेच सामान्य पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता मात्र यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार जगभरातील हवामानावर परिणाम करणारा लागला आहे. ला नीनोमुळे परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यांना चांगला पाऊस होण्याची  पडण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला नीना परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे अंदाजा मान्सून गेल्यावर्षी पेक्षा चांगला असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.



यंदा मान्सून किती टक्के पडणार!


यंदा सरासरी पेक्षा एकशे सहा% जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे आय एम डी च्या अंदाजानुसार यंदा भारतात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी 15 एप्रिल रोजी मान्सूनचा अंदाज वर्तवला ही माहिती दिली होती. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज परतवला होता. आता हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे . यावर्षी (मानसून, Monsoon 2024) सामान्य पेक्षा अधिक बरसणार असल्याचा हवामान विभागाचा म्हणणं आहे यंदा महाराष्ट्रतही (Maharashtra Monsoon Update) मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज आहे आय एम डी वर्तवला आहे.





Wednesday, May 15, 2024

बियाणे अनुदान योजना -2024 शेतकऱ्यांना मिळणार आहे शंभर टक्के अनुदानावर बियाणे(maha DBT)

 Biyane Anudan Yojana 2024 Maharashtra: आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा खरीप हंगाम सुरू होणार आहे. करिता राज्य सरकार अनुदानावर बियाणे वाटप करणार आहे.


Biyane Anudan Yojana 2024 Maharashtra




अन्नधान्य व गळतीची पिके या दोन बाबी लक्षात घेऊन जिल्हा न्याय पीके व जिल्हा देण्यात आलेला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान द्वारा बनवण्यासाठी अनुदान देणार येणार आहे.

सदर योजना ही MAHA DBT पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे या लेखनामध्ये योजनेचा बद्दल संपूर्ण माहिती ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याची पूर्वपणे माहिती जाणून घेणार आहोत.

   Biyane Anudan Yojana📢📢📢📢


सन 2007-08 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन बारावी पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियान अंतर्गत सोयाबीन, तुर असे अनेक कडधान्य पिकाचा समावेश करण्यात आला आहे.

सन 2014 ते 15 पासून बारावी पंचवार्षिक योजनेसाठी मार्गदर्शक सूचनानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहेत.

सन 2018 ते 19 व 2019 ते 20 ही वर्ष केंद्र शासनाने पौष्टिक तुर्धान्य नेटवर्क सिरीयल वर्ष म्हणून जारी केली आहेत त्या अनुसरून सण 2018 ते 19 पासून केंद्र शासनाने.

  • पूर्वीच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान दुधान्य अभियानात बदल करून
  • दोन स्वतंत्र अभियान राबविण्याचे धोरण अंगी अंगीकारले आहे.
  • त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भरधान्यअंतर्गत मका, पिक
  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तुर्धान्य ,नियुक्ती सिरीयल अंतर्गत ज्वारी, बाजरी, वर रांगी, या पिकांसाठी स्वतंत्र अभियान सुरू केली आहेत.


बियाणी वितरण 2024

  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन ( सूक्ष्म मूलद्रव्य), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पीक संरक्षण )औषधी व जैविक घटक, तणनाशके), व्यक्ती शेततळे, पंप विविध कृषी अवजारे, या बाबींना अनुदान देण्यात येईल.
  • व्यक्ती शेततळे, पंप संच, पाईप, या घटकांचा लाभ पाहण्याकरता कृपया दस्तावेज पहा.
  • विविध कृषी अवजारे या घटकांचा लाभ पाहण्याकरिता कृपया दस्तावेज पहा .
  • बियाणे वितरण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन सूक्ष्म मूलद्रव्य एकात्मिक कीड व्यवस्थापन ( पीक संरक्षण औषधे व जैविक घटक  तणनाशके) Biyani anudan Yojana

बियाणे अनुदान योजना पात्रता

1) केंद्र शासनाने विकणे आहे निवडलेले जिल्हे खालील प्रमाणे आहे,
  • रासूल भात-नाशिक, पुणे, सातारा ,नागपूर, भंडारा ,गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली, आठ जिल्हे
  • सोयाबीन-सोलापूर, बीड, नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना, परभणी बीड  ,धाराशिव
  • कडधान्यासाठी सर्व महाराष्ट्रातील जिल्हे
  • भरडधान्य मक्का-सांगली ,अहमदनगर ,औरंगाबाद ,जालना ,नाशिक ,धुळे, व जळगाव ,एकूण सात जिल्हे
  • पौष्टिकर्धान्य ज्वारी बाजरी रांगी एकूण 26 जिल्हे) Biyani anudan Yojana
1. ज्वारी-नाशिक ,धुळे, नंदुरबार, जळगाव ,अहमदनगर, पुणे, सोलापूर ,सातारा, सांगली कोल्हापूर, औरंगाबाद ,बीड ,जालना, लातूर ,उस्मानाबाद, नांदेड, परभणी ,हिंगोली, बुलढाणा ,अकोला, वाशिम, अमरावती ,व यवतमाळ 23 जिल्हे)
2. बाजरी-नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद, एकूण 11 जिल्हे)
4. रगी-नाशिक ,पुणे ,सातारा ,कोल्हापूर ,ठाणे ,पालघर ,शहर ,रायगड , रत्नागिरी एकूण सात जिल्हे)
3. कापूस-(अमरावती विभाग)-बुलढाणा ,अकोला ,अमरावती, वाशिम, यवतमाळ ,नागपूर ,विभाग वर्धा, नागपूर, चंद्रपूर.
4. ऊस: (औरंगाबाद विभाग) औरंगाबाद, जालना, बीड, लातूर ,विभाग लातूर उस्मानाबाद ,नांदेड परभणी, हिंगोली.
5. सोयाबीन-महाराष्ट्रातील सर्व जिल्हे.

वरील नमूद केलेल्या जिल्ह्या त हरभरा बियाण्यासाठी दहा वर्षातील वाणास रुपये पंचवीस प्रति किलो दहा वर्षे वर्षावरील वाणास प्रति 12 रुपये किलो.



                                   Biyani anudan Yojana Maharashtra 2024📢📢📢
  • जर शेतकरी तांदूळ गहू डाळिंब कापूस ऊस त्यांच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही घटकांसाठी अर्ज करीत असेल तर वरील दिलेली जिल्हे त्या घटकांसाठी अनिवार्य राहतील
  • कोणत्याही बाबीसाठी फक्त एकच योजनेतून अनुदान दे आहे
  • शेतकरी अनुसूचित जातीची अनुसूचित जमाती या जाती जाती वर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • जर लाभार्थ्याला गळती धान्य पिके यामधून लाभ घ्यायचा असल्यास त्याच्या शेतात बळीरांनी पिके असणे आवश्यक आहे आणि जर लाभार्थ्याला
  • वृक्ष जनतेला व्हीआयपी की यामधून लाभ घ्यायचा असल्यास त्याच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
  • सर्वांची शेतकऱ्याची स्वतःची नावे सातबारा व आठ अ उतारा असणे बंधनकारक राहील .
बियाणे अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे
  1. सातबारा- प्रमाणपत्र
  2. आठ- अ प्रमाणपत्र
  3. खरेदी -करण्याचे साधन उपकरणाची कोटेशन (पंप शेततळे या घटकाकरिता)
  4. केंद्र सरकारच्या मान्यता प्राप्त एजन्सीची चाचणी प्रमाणपत्र पंप घटकासाठी 
  5. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  6. हमीपत्र-
  7. पूर्वसंमती पत्र

बियाणे अनुदान योजना अनुदान मर्यादा आजची अंतिम तारीख
निवड प्रक्रिया 
  • अनुदान सर्व बियाण्यासाठी 50 टक्के अनुदान
  • मर्यादा दोन हेक्टर पर्यंत मुदत दिली जाईल
  • अंतिम तारीख last date 31 may 2024
  • निवड प्रक्रिया-शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होईल .



धन्यवाद...👃👃👃👃

Tuesday, May 14, 2024

अवकाळी (Unseasonal rain)पावसाचा मुक्काम लांबला; पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे ,जळगाव , या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

 Panjab Dakh News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरे तर सध्या स्थितीला अनेक भागातील शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामासाठी करत असल्याची पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आगामी खरीप पूर्व मशागतीची तयारी सुरू झाली असून शेतकरी बांधव बियाण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत. आणि भांडवल उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत बँकांकडून पीक कर्ज घेण्यासाठी तथा इतर पर्यायी मार्गाने पैशाची जमा जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. 


Unseasonal rain


 Panjab Dakh News





दुसरीकडे शेतकऱ्यांचे आगामी मान्सून कडे देखील लक्ष लागू नये मोसमी पावसाला कधी सुरुवात होणार? मान्सून मध्ये कसा पाऊस पडत बसणार कसे राहणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. मात्र असे असताना गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.



वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय याचा आगामी मान्सूनवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांना आहे. अशा त्याचा आता शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जेष्ठ आम्हाला अभ्यासात पंजाब डख यांनी सध्या असलेल्या वादळी पाऊस आणखी किती दिवस पर असणारी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

आणखी किती दिवस सुरू राहणार वादळी पावसाची सत्र ⛅⛅⛅⛅⛅


पंजाबराव आणि दिलेल्या माहितीनुसार राज्यात 12 मे ते 18 मे दरम्यान पावसाची शक्यता आहे आधी पंजाबरावनि 7 मे ते11मे  या कालावधीमध्ये पावसाचा अंदाज दिला होता विशेष म्हणजे पंजाबराव आणि सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे अशातच आता पंजाबराव आणि पर्यंत राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज नुकताच वर्तवला आहे.


या कालावधीमधील राज्यातील खानदेश सहित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात देखील या कालावधीमध्ये पाऊस पडणार मात्र विदर्भातील पावसाचा जोर हा काहीसा कमी राहिला असा अंदाज यावेळी जेष्ठ आम्हाला अभ्यासक पंजाबराव यांनी वर्तवला  आहे.


या कालावधीमध्ये राज्यातील मध्य महाराष्ट्र सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे याशिवाय मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर ,बीड, जालना, लातूर ,धाराशिव ,परभणी ,नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील देखील मुसळधार पाऊस पडेल अशी पंजाबराव यांनी आपल्या नवीन हवामान अंदाज स्पष्ट केले आहे.

  weather forecast today 2024⛅


या कालावधीमध्ये कोकणात देखील मोठा पाऊस पडू शकतो असे पंजाब यांनी म्हटली आहे मात्र हा वादळी पाऊस 18 मी नंतर कमी होत जाईल असा अंदाज आहे यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची विशेष काळजी घ्यायची आहे.


या कालावधीत वादळी वारी आणि विजाचे प्रमाण अधिक राहणार आहे यामुळे आपल्या पशुधनाची देखील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे पंजाबराव आणि म्हटले आहे तथापि सध्या सुरू असलेला हा पाऊस राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे या पावसामुळे उसाची दोन-तीन पाणी वाचतील असे म्हटले जात आहे.


मान्सून बाबत पंजाबरावांचा अंदाज काय?⛅⛅⛅⛅⛅


पंजाबरावयांनी  मान्सून बाबत नुकतेच काही दिवसांपूर्वी अंदाज दिला आहे, यामध्ये त्यांनी मे पर्यंत मान्सूनचे अंदमानत आगमन होईल असे म्हटले आहे. तसेच तिथून पुढील वीस दिवसात अर्थातच नऊ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असेल त्यांनी सांगितले तथापि यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पेरण्या या जून महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील.


हे पण वाचा:-PM vishwakarama yojana: प्रशिक्षना नंतर मिळणार बिनव्याजी कर्ज, वाचा सविस्तर📢📢📢📢



यंदा जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात जास्त पाऊस ,ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस, आणि सप्टेंबर, तथा ऑक्टोबर, महिन्यात जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी दिला आहे. एवढेच नाही तर यंदा 5 नोव्हेंबरला मान्सून माघारी परतणार असेही त्यांनी सांगितले आहे. यंदा मान्सून काळा चांगला पाऊस होईल असे त्यांनी सांगितले असून यामुळे शेतकऱ्यांना चागली  कमाई होणार अशी आशा व्यक्त होत आहे .




Panjab Dakh  weather forecast today 2024⛅⛅⛅
 

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...