Tuesday, April 30, 2024

सिमला मिरचीवर कोकडा रोगाचा प्रदुर्भाव-Simla mirchivar kokda rogacha pradurbhav


Simla mirchivar kokda rogacha pradurbhav







मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव,शेतकरी हवालदिल


भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सिमला मिरचीची लागवड केली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.











वदोड तांगडा: भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा परिसरात मोठ्या प्रमाणात सिमला मिरचीची लागवड करण्यात आली आहे. परंतु बदलत्या वातावरणाचा फटका बसत असून शिमला मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कोणत्या औषधाची फवारणी करावी हे शेतकऱ्यांना समजत नसल्याने केलेला खर्च वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
कोकडा रोग पडल्यानंतर मिरची मुळासकट उपटून टाकावी लागत आहे त्यामुळे अनेक शेतकरी रात्री फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे, शिमला,  पिकिटोर, बळीराम, जातीच्या मिरचीला लवकर लाभ लागतो.

कृषी सेवकांनी मार्गदर्शन करावे

  • बाजारातील 50 ते 60 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी मिरची पिकाकडे अधिक लक्ष देतात.
  • त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कृषी सेवकांनी मार्गदर्शन करावी अशी मागणी होत आहे.





9 comments:

Featured Post

ई- पिक पाहणी चे फायदे

  ई- पिक पाहणी चे फायदे पिक पाहणी म्हणजे शेतामध्ये पिकाची स्थिती , त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना...